Showing posts with label L-कृष्ण भट बांदेकर. Show all posts
Showing posts with label L-कृष्ण भट बांदेकर. Show all posts

विश्वाचा विश्राम रे,Vishvacha Visram Re

विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे

चिद्‌रत्ना घन खाण रे, एकाएकी जाण रे
प्राणांचाही प्राण माझा गड्या तुझी आण रे

देवाचा जो देव रे, तो हा स्वयमेव रे
अलक्ष लक्षुनी साखी घेउ अंगी खेम रे

शिवाचा आराम रे, भक्तपूर्ण काम रे
मुक्त योगीजन गाती तयासी निष्काम रे

मिथ्या दे अनेक रे, सत्य राम एक रे
विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे