Netbhet Youtube Channel

ASE KONI असे कोणीअसे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही
हाक कुणाची  कानी येते 
अलगद कोठे घेऊन जाते

असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
हे ना जरी ओळखीचे वाटते
हे का परि वाटते आपुले
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

तुझे बहरणे तुझे निरखणे
किती हवेसे वाटते
तुझे निरखणे माझे बहरणे
ओळखीचे वाटते
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

भास कि खरे हे सांग एकदा रे
मार्ग हा कोणता बोल ना  रे
साथ जन्मजन्माची साक्ष ही मनाची 
सांगते ही धरा बोलते आभाळ किती काय राणी
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही

बघता बघता जादू घडते
बघता बघता भूल पडते
बघता बघता सर ही झरते
बघता बघता मन मोहरते

Lyrics - SANDEEP KHARE संदिप खरे
Music -S.J.SURYA एस. जे.सूर्या
Singer -VAISHALI SAMANT,VISHWJIT JOSHI वैशाली सामंत ,विश्वजीत जोशी
Movie / Natak / Album -ISHQ WALA LOVE  इश्क़ वाला लव 

प्रेम म्हणजे प्रेम असतं PREM MHANJE PREMप्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

त्या वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव,वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे सतत उचकी
प्रेम म्हणजे ठसका
दुरून पाहता गोड शिरशिरी
समीप येता धसका

प्रेम म्हणजे सतत उचकी
प्रेम म्हणजे ठसका
दुरून पाहता गोड शिरशिरी
समीप येता धसका

प्रेम म्हणजे हरवून जाणे
फक्त शोधत रहाणे
प्रेम म्हणजे जागेपणीचे
हळवे स्वप्न दिवाणे
स्वप्न दिवाणे

प्रेम म्हणजे हरवून जाणे
फक्त शोधत रहाणे
प्रेम म्हणजे जागेपणीचे
हळवे स्वप्न दिवाणे
स्वप्न दिवाणे

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

त्या वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव,वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे मृदुगंधाचे
मंद मंद पसरणे
पौर्णिमेचा चंद्र पाहता
सागराचे उसळणे

प्रेम म्हणजे मृदुगंधाचे
मंद मंद पसरणे
पौर्णिमेचा चंद्र पाहता
सागराचे उसळणे

प्रेम म्हणजे तुझ्याही नकळत
तुझेच होऊन जाणे
जीवनाच्या हिंदोलायाचे
गाणे धुंद तराने
धुंद तराने मधुर सुहाने

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अडीच अक्षराच नाव
प्रेम असतो श्वास ज्यांचा
त्या वेड्यांचा गाव

त्या वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव ,वेड्यांचा गाव
वेड्यांचा गाव,वेड्यांचा गावLyrics -Sachin Goswami सचिन गोस्वामी
Music -Amir Hadkar अमीर हदकर
Singer -Ranvir, Chirag रणवीर ,चिराग


धरिला पंढरीचा चोर DHARILA PANDHRICHA CHORधरिला
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर

गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर

धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर

हृदयबंदी खाना केला
हृदयबंदी खाना केला
आत विठ्ठल क्वान्डीला (कोंडीला)
आत विठ्ठल क्वान्डीला (कोंडीला)
शक्ती केली दडादुडी
शक्ती केली दडादुडी
विठ्ठल पायी घातली बेडी
विठ्ठल पायी घातली बेडी
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर

शब्दाचा मारा केला
शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुळतीला आला
विठ्ठल काकुळतीला आला
जनी म्हणे बा विठ्ठला
जनी म्हणे बा विठ्ठला
जीवे न सोडी मी रे तुला
जीवे न सोडी मी रे तुला
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर

गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर


Lyrics -संत जनाबाई SANT JANAABAI
Music -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Singer -विश्वनाथ मोरे VISHWNATH MORE
Movie / Natak / Album -पंढरीची वारी PANDHARICHI  WARI

अशी न राहील रात्र ASHI N RAHIL RATR

जा अशी झेलीत तू घण दु:खाचे नारी
या दु:खातून उजळून येईल भाग्य तुझे संसारी

अशी न राहील रात निरंतर
प्रकाश येतो रात्री नंतर

लढता लढता येथे जगणे
हसता हसता घाव सोसणे
पाऊल पुढचे पुढे टाकणे
जीवन हा संग्राम खरोखर

चुकले नाही दु:ख कुणाला
सीता, अहल्या, दमयंतीला
ध्येयापासून नाही ढळल्या
झेलुनिया संकटे शिरावर


Lyrics -मधुसूदन कालेलकर MADHUSUDAN KALELKAR
Music -शंकरराव कुलकर्णी SHANKARAW KOLAKARNI
Singer -सुधीर फडके  SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -पहिले प्रेम PAHILE PREM

सखे बाई सांगते SAKHE BAI SANGATE

सखे बाई सांगते मी नवनवल गे
गमते मना मृदु भावना
हृदयींची शतजन्‍मींची गे

स्वप्‍नात तयाशी प्रहर प्रहर बोलते
या मनोरथातुनी योजनभर विहरते
गमते मना सुख साधना
हृदयींची शतजन्‍मींची गे

नित्‌ प्रीत उमलतसे
माला मी गुंफितसे
भक्‍ति ज्योति तेवतसे
मन हसे, तन हसे, मधुरसे

Lyrics -योगिनी जोगळेकर YOGINI JGALEKAR
Music -पं. राम मराठे PANDIT.RAM MARATHE
Singer -कीर्ती शिलेदार KIRTI SHILEDAR
Movie / Natak / Album -रंगात रंगला श्रीरंग RANGAT RANGALA SHRIRANG

हरीची ऐकताच मुरली HARICHI AIKATACH MURALI

हरीची ऐकताच मुरली
राधिका, राधिका न उरली

आसावरीचे सूर कोवळे
पहाटवारा पिऊनी आले
घुसळण करिता आत थांबले
डेर्‍यामधुनी, दह्यादुधातुनी यमुना अवतरली

वेड असे कैसे विसरावे
फुलातुनी गंधा तोडावे
नभातुनी रंगा वगळावे
वेडी राधा, वेडा माधव, वेडी ती मुरली


Lyrics -योगिनी जोगळेकर  YOGINI JOGALEKAR
Music -पं. राम मराठे PANDIT.RAM MARATHE
Singer -कीर्ती शिलेदार KITRI SHILEDAR
Movie / Natak / Album -रंगात रंगला श्रीरंग RANGAT RANGALA SHRIRANG

भक्‍ताचिया काजासाठी BHAKTACHIYA KAJASATHI

भक्‍ताचिया काजासाठी साधुचिया प्रेमासाठी,
सोडली मी लाज रे ॥१॥

धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥

वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे ।
स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥

दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो ।
आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌ची पेज रे ॥४॥

पुर्णब्रह्म म्हणती माते, पुर्णब्रह्म मींच त्यांते ।
ऐंसी याची जाणीव ते, म्हणे अमृतराय रे ॥५॥


Singer -कीर्ती शिलेदार  KIRTI SHILEDAR

ही रात सवत बाई HI RAT SAVAT BAI

ही रात सवत बाई

सजणास येऊ नच देई

फुलशेज जिवाची केली

चांदवा नयनींचा केला

दस लाख चंद्रज्योती

अंती अशा निमाल्या

हे दु:ख कशी ग साहु

बांका वसंत आला

Singer -पं. मल्लिकार्जून मन्सूर PANDIT.MALLIKARJUN MANSUR

हे कुठवर साहू HE KUTHWAR SAHU

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी?

दिसू लागले अभ्र सभोंती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतर-ज्योती
कसा सावरू देह परि?

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्‍ग गळाले भूमिवरी

पावन-खिंडित पाउल रोवुन
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता घरी?

Lyrics -कुसुमाग्रज KUSUMAGRAJ
Music -पं. हृदयनाथ मंगेशकर PANDIT.HRUDAYNAT MANGESHAKAR
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR

सकल मिळुनि हसुनि SAKAL MILUNI HASUNI

सकल मिळुनि हसुनि खुलुनि गोफ गुंफु या ग
पदर पदर स्वकरि धरुनि नाच नाचु या ग

नाचताति पवनी फुले, डुलति सुमपराग खुळे
चपलचरणि त्यास खुडुनि आजि वेचु या ग

वर्ष-वर्षतात मेघ, जलधारा झरति सुभग
लपत छपत स्वकरि अमित, त्यासि वेचु या ग

मधुर गान गाउनिया प्रेमरंगि रंगुनिया
गोफ विणुनि सुजन-चरणि आजि वाहु या ग

Lyrics -संजीवनी मराठे SANJIVANI MARATHE
Music -श्रीनिवास खळे SHRINIWAS KHALE
Singer -सुमन कल्याणपूर SUMAN KALYANPURKAR

Designed By Seo Blogger Templates - Published By Gooyaabi Templates