सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची

सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे
सावळ्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रातदिन तू सावर रे
सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ऋतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे, दिवस हे चांदण्यांचे
पानगळ ही सोसताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे
स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे
जाईल आता आस ही उतू बघ रातही सरे
पावसाच्या खुणांचे, दिवस हे पैंजणांचे
मी हवेतून चालताना, सावर रे ए मना , सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

बहरताना बावरले, सुख जरासे आवरले
तोल माझा खोल जाई, सावर रे

Lyrics -
Music -
Singer -
Movie / Natak / Album - Mitwaa 

3 comments: