Showing posts with label S-सुधीर फडके. Show all posts
Showing posts with label S-सुधीर फडके. Show all posts

अशी न राहील रात्र ASHI N RAHIL RATR

जा अशी झेलीत तू घण दु:खाचे नारी
या दु:खातून उजळून येईल भाग्य तुझे संसारी

अशी न राहील रात निरंतर
प्रकाश येतो रात्री नंतर

लढता लढता येथे जगणे
हसता हसता घाव सोसणे
पाऊल पुढचे पुढे टाकणे
जीवन हा संग्राम खरोखर

चुकले नाही दु:ख कुणाला
सीता, अहल्या, दमयंतीला
ध्येयापासून नाही ढळल्या
झेलुनिया संकटे शिरावर


Lyrics -मधुसूदन कालेलकर MADHUSUDAN KALELKAR
Music -शंकरराव कुलकर्णी SHANKARAW KOLAKARNI
Singer -सुधीर फडके  SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -पहिले प्रेम PAHILE PREM

EKA MAKADANE KADALAY

एका माकडाने काढलंय दुकान
आली गिऱ्हाईके छान छान

मनीने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी उंदीर हवे

अस्वल आले नाचवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय

कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा
आणि म्हणाला मांडून ठेवा

माकड म्हणाले लावून गंध
आता झालंय दुकान बंद

Lyrics -ग. दि. माडगुळकर G.D. MADAGULAKR
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -गीत  GEET

EKAVAR PANKHAWARUNI FIRO

एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई, ठायी ठायी केले स्नेही
तुझ्यविना नव्हते कोणी आत अंतरात

फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी
तुझ्या मनगटी ही बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा मी भोळा, पडेन का तुझिया डोळा
मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात


Lyrics - ग. दि. माडगुळकर G.D .MADAGULAKAR
Music -वसंत पवार VASANT PAWAR
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -वरदक्षिणा - १९६२ VARADAKSHINA 1962

गेलीस सोडुनी का GELIS SODUNI KA

गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी ?

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

देवी तुझ्याविना मी देहा धरू कशाला ?

नारीविना जगी ना सामर्थ्य पौरुषाला

अर्धांग भस्म झाले, अर्धाच मी, अभागी

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

विसरू कसा सखे मी आनंद भोगलेला ?

घर शैल कंदरीचे गिरीशीर्ष चंद्रशाला

संसार सौख्यदायी सहवास सप्तरंगी

अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album - 'शिवपार्वती' SHIVPARWATI

नसे राउळी वा नसे मंदिरी NASE RAULI WA NASE MANDIRI

नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी !

जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम
दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी !

नको मंत्र त्याला मुनिब्राम्हणांचे
तया आवडे गीत श्वासां-घणांचे
वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी !

शिळा फोडिती संघ पाथरवटांचे
कुणी कापसा रूप देती पटांचे
तयांच्या घरी नांदतो तो मुरारी !

जिथे काम तेथे उभा श्याम आहे
नव्हे धर्म रे घर्म ते रूप पाहे
असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी !

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -सुधीर फडके  SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -उमज पडेल तर UMAJ PADEL TAR

एकवार पंखावरुनी फिरो EKWAR PANKHAWARUNI FIRO

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -वसंत पवार  VASANT PAWAR
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -वरदक्षिणा (१९६२) VARADAKSHINA

नाम घेता मुखी राघवाचे NAM GHETA MUKHI RAGHAVACHE



नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

अंजनी उदरी जन्मला
भक्षिण्या रवि धावला
धावणे वायुपरी ज्याचे

रूप मेरूपरी घेउनी
तरू पाहे सिंधू लंघुनी
करुनिया दहन लंकेचे

जमवुनी वानरे सारी
बांधिला सेतू सागरी
बळ महान बाहुबलीचे

नित रमे राम जपतपी
जाहला अमर तो कपी
गुण गाता रघुसेवकाचे

Lyrics -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak  / Album -गीत GEET

दैवजात दु:खे भरता DAIVJAT DUKHE BHARATA

दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा 
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात
राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा

जिवासवे जन्मे मृत्यु जाड़े जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा

तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत
अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा

जरा मरण  यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा

नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा

नको आग्रहाने मजसी  परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा

संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोघयेस नाही येणे सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा

पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तू लोभी अयोध्या पुरीचा

Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET 

नारदा मुनीवरा NARADA MUNIVARA

नारदा मुनीवरा,तुझे मी गातो गौरवगीत
रंगले हरी भजनी संगीत

गळ्यांत वीणा चिपळया  हाती ,सदा वसे नारायण ओठी 
अवतरुणी तू क्षणोक्षणी रे साधीशी जगाचे हित 

 दोन खडावा पवित्र पायी ,शिखिरीची शोभे शुभदायी
कधी कुठे कळ लाउनी रे करिशी मती आमुची कुंठित

त्रिभुवनी रोज जपून धावा सत्कार्याचा घेऊन पावा 
चराचरासी तारन्यास व्रतवैकल्ये  दावीत   

Music -सुधीर फडके  SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भावगीत BHAVGEET

बाळ जा मज बोलवेणा BAL JA MAJ BOLAWENA

दाटला आता गळा
तू राहा सोख्यांत बाळे  
अश्रु ढाळु दे मला
मीच कन्यादान केले
करुण मोठा सोहळा
सासरी निघता परी तू
उर माझा भंगला
ना तुला कळतील माझ्या
वेदनेच्या या कळा
बाळ जा

पुस डोळे बंध तुटले
येथले सारे आता
राहू दे वैराण वेळी
यापुढे मज एकटा
तुज लाभे सौभाग्य लक्ष्मी
पुण्य माझे हे तुला

Music -सुधीर फडके  SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

मी कशी ओळखू प्रीती MI KASHALA OLAKHU PRITI

मी कशी ओळखू प्रीती
हे ह्रदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही
हे देवाघरचे देणे 

हिरवे पण पिऊनी ओले 
थेंबाचे मोती झाले
मी कशाला फुलोरा शोधू
हे फुल म्हणु कि पाने

का नकळत डोळे मिटती
स्पर्शात शहारे उठती
मी कशी भावना बोलू
हे शब्दम्हणू की गाणे 
प्रेमाला उपमा नाही
हे देवाघरचे देणे 

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

चल सोडूनि हा CHAL SODUNI HA

आईलाही विसरुनी जाती
या देशातील पीले अडाणी
चल सोडूनि हा देश पक्षिणी

विराण झाले अरण्य सारे
भणभण करिते भीषण वारे 
दिसे न कोठे अन्नाचा
कुठे दिसे पाणी

मोडुनी पडली घरटी कोठी
सखे राहशील कुठे एकटी
इथे न नांदे कोणी जिवलग
नसे आप्त ही कोणी
उडुनि उंच जा 
उध्व दिशेला  
मार्ग मानिनी अन्य न तुजला
स्वार्थाविन ना धर्म जाणिति 
खुळे येथले प्राणी

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE 
Movie -गीत GEET 

निरोप कसला माझा घेता NIROP KASALA MAAJHA GHETA

निरोप कसला माझा घेता ?जेथे राघव तेथे सीता

ज्या मार्गी हे चरण चालती ,त्या मार्गी मी त्यांचा पुढती
वनवासाची मला न भीती ,संगे आपण भाग्य विधाता

संगे असता नाथा आपण प्रासदाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतील जन सिहांसन ,रघुकुलशेखर  वरी बैसता 

वनी श्वापदे क्रूर निशाचर ,भय न तयांचे मजसी तिळभर
पुढती मागे दोन धनुधर्र ,हे चाप त्यांकरी पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठी ,दडले होते धरणी पोटी
त्या चरणांचा विरह शेवटी ,काय दिव्य हे मला सांगता ?

कोणासाठी सदनी राहू ? कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ
कां भरतावर छत्रे पाहु ,दास्य करू कां कारण नसता

कां कैकयी वर मिळवी तीसरा ?कां  आपुल्याही  मनी मंथरा
कां छळिता मग वृथा अंतरा ?एकटिस मज कां हो त्यजिता 

विजनवास या आहे दैवी ,,ठाऊक होते मला शैशवी
सुखदू:खांकित  जन्म मानवी ,दू :ख सुखाने प्रीती लाभतां  

तोडा आपण मी न तोडिते ,शतजन्माचे आपुले नाते 
वनवासासी मी ही येते ,जाया -पति कां त्यात आणिता

मूक राहतां कां हो आता कितीदा ठेवु चरनी माथा
असेन चुकले कुठे बोलता क्षमा करावी जानकी नाथा

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

आपुल्या दया पादुका AAPULYA DYA PAADUKA

तात गेले माय गेली भरत आता पोरका
मागने हे एक रामा आपुल्या दया पादुका

वैनतेयाची भरारी काय मशका साधते ?
कां जगाचा भार कोणी अश्वपृष्ठि लादते ?
राज्य करने राघवाचे भरता शक्य कां ?

वंशरीती हेच सांगे थोर तो सिहांसनी
सान तो सिहांसिनी कां जेष्ठ ऐसा  काननी ?
दान देता राज्य कैसे या पदांचा सेवका ?

घेतला मी वेष मुणींचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेऊ का माथी प्रजेचा रोष तो 
काय आदन्या आगळी हि तुम्हीच देता बालका ?

राम नाही चरणचिन्हे राहु दया ही मंदिरी
नगरसीमा सोडूनि मी राहतो कोठे तरी
भास्करांच्या किरणरेखा सांध्यकाळी दीपिका

चालवितो राज्य रामा दुरून तुम्ही येई तो
मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो  
नांदतो राज्यांत तीर्थी कमलपत्रा सारखा 

सांगता तेव्हा न आले चरण जर मागुती
त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रार्थना ही कपाळी पाउलांची मृत्तिका

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

तुज सगुण म्हणो की TUJ SAGUN MHANO KI

तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुन निर्गुण एकु गोविंदु रे !

अनुमानेला अनुमानेला श्रुति नेती नेती
म्हणती  गोविंदु रे !

तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे 
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे !

निवृत्ति  प्रसादे ज्ञानदेव बोले 
बापरखुमाई देवीवरु विठ्ठलु रे !  

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET 

एकतारी संगे EKATARI SANGE

एकतारी संगे एकरूप झालो
आम्ही विठलाच्या भजनांत न्हालो  

गळा माळ शोभे आत्मरूप शांती 
भक्तिभाव दोन्ही ,टाळ धरु हाती 
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो 

भूक भाकरीची -छाया झोपडीची
निवा रयास घ्यावी उब गोधडीची
माया मोह सारे उगाळुन प्यालो 

पूर्ण पुण्य त्याचे मिळे सुख त्याला
कुणी राव होई कुणी रंक झाला
मागने न काही मागण्यास आलो

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीते  BHAKTIGEETE

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,Stri Janma Hi Tujhi Kahani

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत, नयनी पाणी

तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी !

कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसि जगावर
दशा तुझी ही केविलवाणी !

सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणात ठरसी तूच पापिणी !

स्वर आले दुरुनी,Swar Aale Duruni

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वाऱ्याचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी

स्वयंवर झालें सीतेचे,Swayamvar Jhale Siteche

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें

स्वये श्रीरामप्रभु ऐकती,Svaye ShriRam Prabhu

स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत - वैभव - गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ - मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परी तो उभयां नच माहिती