Showing posts with label M-वसंत प्रभू. Show all posts
Showing posts with label M-वसंत प्रभू. Show all posts

जन्मोजन्मीं तुम्हीच JANMOJANMI TUMHICH

जन्मोजन्मीं तुम्हीच यावे माझ्या संसारी
एकच आशा सदैव राहील अखेरची ह्या उरी

अलंकार सोन्याचे मजला नकोत माणिकमोती
शपथ गळ्याची तुमच्या घ्यावी माझी पूरी कसोटी
महालात जन्मले, वाढले वैभवात मी जरी

मंगल सौभाग्याचा ठेवा तुमच्या चरणांमधी
अखंड वाहील प्रीतीची का निर्मळ गंगा मधी
युगायुगांच्या गाठीभेटी पडतील वरचेवरी


Lyrics -अनिल भारती ANIL BHARATI
Music -वसंत प्रभू VASANT PABHU
Singer -सुलोचना चव्हाण  SULOCHANA CHAVHAN

रघुपती राघव गजरी RAGHUPATI RAGHAW GAJARI

रघुपती राघव गजरी, गजरी
तोडीत बोरे शबरी

ध्यानी जपली मनी पूजिली
रघुनाथाची मूर्त सावळी
बघावयाला याच डोळी
आतुरले मी किती अंतरी

रामनाम ते वदता वाचे
अमृत लाघव अधरी नाचे
हाती येता फळ भक्तीचे
चाखीत होते नाम माधुरी

भजनी रमुनी भिल्लीण श्यामा
म्हणते लवकर ये रे रामा
आलिंगुनी या भक्ती प्रेमा
स्वर्ग बघू दे मला भूवरी

Lyrics -पी. सावळाराम  P.SAWALARAM
Music -वसंत प्रभू VASANT PRABHU
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

रुणझुनु रुणझुनु रे भ्रमरा RUNZUNU RUNZUNU RE BHRAMARA

रुणझुनु रुणझुनु रे भ्रमरा
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा 

चरण कमळदळु रे भ्रमरा 
भोगी तू निक्षळू रे भ्रमरा

सुमन सुगंध रे भ्रमरा
परिमळ विदगदु रे भ्रमरा  

सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा
बापरखुमादेवी वरु रे भ्रमरा  

Mucic-वसंत प्रभू  VASANT PRABHU
Singer -लता मंगेशकर  LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

तू सहज मला पाहिले Tu Sahaj Mala Pahile

तू सहज मला पाहिले, मी सहज तुला पाहिले
पहाण्याचे मग क्षणात अपणा व्यसन पुरे लागले

तव पहाण्याचा अर्थ कळेना मला
मम पहाण्याचा अर्थ कळेना तुला
लावायाचा अर्थ केवी दोघांनी ठरविले

होऊ लागल्या चोरून भेटी, अर्थ लावण्यासाठी
विलग अक्षरे करून बांधली नजरेच्या गाठी
हासू लागले या वेडाला तुझे न्‌ माझे डोळे

बघायचे मी जरा टाळता आलीस भेटायाला
म्हणालीस तू चला बसू या, अर्थ लावण्याला
लावायाचा अर्थ काय तो ? सर्व काही कळले

Lyrics - P Savlaram पी. सावळाराम
Music -  Vasant Prabhu वसंत प्रभू
Singer -  Bhal;chandra Patekar भालचंद्र पाटेकर
Movie / Natak / Album -

हर्षाचा वर्षाचा दिवाळी,Harshacha Varshacha Diwali

हर्षाचा, वर्षाचा
दिवाळी सण आला

कारंजी उठती तेजाळ
नाचती बाळ गोपाळ
आनंद दीप गोविंद
उधळतो चांदणी झेला

लक्षुमी देवता खरी
पुजितो दास श्रीहरी
भक्तीचा जीव प्रीतीचा
अंबरी दीप लखलखला

प्रतिपदा मूर्त मंगला
ओवाळी पति देवाला
हसता प्रेम अर्पिता
उतरला स्वर्ग भूमीतला

हसुनि एकदा मला मुकुंदा,Hasuni Ekada Mala Mukunda

हसुनि एकदा मला मुकुंदा, केलीस का रे वेडे ?
चित्र तुझे रे नेत्र काढते, बघ ना माझ्याकडे

मोरमुकुट तो तुला शोभला
चंद्र केशरी भाली रेखिला
नकळत जुळले कर गोपाळा
नको मिटु तू नेत्रकमळा, प्रीत भृंग सापडे

अधर चुंबनी मधुरा रमली
नको श्रीधरा घुमवु मुरली
ढळे पापणी गळे कुंचली
सुरासंगती अंतराळी, चित्तपाखरू उडे

कुणी अपुरे ते पूर्ण केले
चित्र तुझे रे मीच झाले
हसलासी तू विश्व हासले
चंद्र काळा नवल घडले, लख्ख चांदणे पडे

हसले ग बाई हसले,Hasale Ga Bai Hasale

हसले ग बाई हसले अन कायमची मी फसले

नयनकवडसा टाकुन कुणीतरी, दिपवी माझे लबाड डोळे
प्रीत-मधाचे सुंदर पोळे, हृदयी शिरुनी चोरुन नेले

सांगायाची चोरी झाली, आई विचारी काय जहाले
चिडले, रुसले, माझ्यावर मी, मलाच होते हरवुन बसले

पाळत ठेवुन त्या लुच्च्याला, धरुनी बांधुन खेचित नेले
वाजत गाजत कैदी केले, शासन करता घरास मुकले

हले हा नंदाघरी पाळणा,Hale Ha Nandaghari Palana

हले हा नंदाघरी पाळणा
त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळ-राणा

ओठ लाल ते डोळे चिमणे
हास्यातुन त्या फुले चांदणे
स्वरूप सुंदर लोभसवाणे
मोहुन घेई मना

बोल बोबडे ते भाग्याचे
शब्द वाटती ते वेदांचे
रुणझुणताती घुंगुरवाळे
ये धेनूंना पान्हा

नंद-यशोदा करिती कौतुक
आनंदाचे अमाप ते सुख
मायपित्याविण कसे कळावे
सौख्य तयाचे कुणा ?

हरि उच्चारणीं अनंत,Hari Ucharani Anant

हरि उच्चारणीं अनंत पापराशि ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥

तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथे ॥३॥

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

हरवले ते गवसले का,Haravale Te Gavasale Ka

हरवले ते गवसले का ? गवसले ते हरवले का ?

मीलनाचा परिमल तोचि, फूल तेचि त्या स्वरुपी
पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का ?

पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरुनि मिळता
जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का ?

दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले, तोचि सुखही दुखाविले का ?

स्वप्ने मनातली का,Swapne Manatali Ka

स्वप्ने मनातली का वाऱ्यावरी विरावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही
नाही तसा परी मी ठावे तुला मलाही
माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी
मी वंचिताच आता झाले जगासमोरी
कोणी अशी कुणाची का वंचना करावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

ते दु:ख, वेदना ती, येथून पाहतो मी
त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी
फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी ?
का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी ?

स्वप्न उद्याचे आज,Swapna Udyache Aaj

स्वप्न उद्याचे आज पडते, चित्र चिमणे गोजिरवाणे
नयना पुढती दुडदुडते !

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे, शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते !

चितोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाळ होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते !

ऊठ म्हणता उठते क्रांती, ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती लाडे लाडे आई म्हणता
भारत-दर्शन मज घडते !

सांग ना मला गडे,Sang Na Mala Gade

सांग ना मला गडे, जायचे कुणीकडे ?

सुटे सुगंधीत वसंत वारे
तरंगती वर प्रीतपाखरे
धुके पांढरे पडे तयांतुन जायचे तुला-मला पुढे

गगन शीरावर पायी धरणी
सदा तरूण मी, ती चिरतरुणी
प्रश्न तुला का पडे, जायचे, सुखातुनी सूखाकडे

ज्यास न शेवट, विश्रांतीस्थळ
प्रीती म्हणजे मार्गच केवळ
तरी आवडे असे जायचे सदा सुखातुनी सूखाकडे

सांग धावत्या जळा,Sang Dhavatya Jala

सांग धावत्या जळा, तुझ्यापरी ओढ उरी
सांग कुणाची मला ?

लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा

हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला, तुझ्या मनाचा लळा

पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा, राव शंतनु खुळा

सूर जुळले शब्दही जुळले,Sur Julale Shabdahi Julale

सूर जुळले शब्दही जुळले
जुळले मधुमय गीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

सात स्वरांची सुरई भरता
नयनी येई काव्य धुंदता
वाजे वीणा निघती ताना
भावही हो पुलकित
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

चमचा घेऊनी ताल साधला
कसा करू पण भाव मोकळा
अबोल झाले शब्द आगळे
प्रीतिसुम रंजित
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

दिसे चांदणे का चंद्राविण ?
प्रीतीवाचून कुठले यौवन
काव्यासह हे कधी व्हायचे
प्रीतीचे संगीत
कधी पण जुळेल अपुली प्रीत ?

सुख येता माझ्या दारी,Sukha Yeta Majhya Dari

सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल दिनसोन्याचा संसारी

सुवासिनीच्या देहतरूवर हर्ष-फुलांचा फुलता मोहर
गंधवती मी होऊन जाइन सुख देवाला सामोरी

नेत्र शिंपली भरता स्वाती, आनंदाचे झरता मोती
पति प्रेमावर उधळित राहिन, मनोमनी का देव्हारी

अमर सुखाची पडता दृष्टी, उजळुन जाता जीवनसृष्टी
उणे न काही सुखरूप मीही, सर्व सुखाच्या मंदिरी

सप्तपदी हे रोज चालते,Saptapadi He Roj Chalate

सप्तपदी हे रोज चालते
तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो, माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुली ही रूप गोजिरी
गोड शिर्शिरी उरात फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळांच्या देठांभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळुनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

सजू मी कशी,Saju Mi Kashi

सजू मी कशी ? नटू मी कशी ?
चोरुन सांग तुला भेटू मी कशी ?

रुप्याचं जोडवं बोटात कचतंय्‌
तुरुतुरु चालता खण्‌खण्‌ वाजतंय्‌
गावाला कळतंय्‌, चालू मी कशी ?

लज्जेला लागता वाकडी नजर
गोरट्या हातानं सावरता पदर
काकणांचा गजर, थांबवू कशी ?

झोकदार नथनी कानात डूल
उरात फुलतंय्‌ चाफ्याचं फूल
वासाची भूल ही, छपवू कशी ?

सखू आली पंढरपूरा,Sakhu Aali Pandharpura

आलिंगुनी अंगिकारा बाप रखुमाईच्या वरा
सोडूनिया घरदारा,सखू आली पंढरपूरा

अनवाणी पायपिटी किती केली आटाआटी
सगुणरूप भेटीसाठी तोडिल्या मी बंधनगाठी
तुळशीहार घाली कंठी विटुनीया संसारा

संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी
लागता मी तुझ्या भजनी, छळिली ही सुवासिनी
सर्वसाक्षी सर्वज्ञानी, तुला ठावे परमेश्वरा

साऱ्या इंद्रियांचे प्राण डोळियांत व्याकळून
मायबाप तुला शरण मागते मी विनवून
दिला जन्म, देई मरण, लेकिला या विश्वंभरा

सखी शेजारिणी,Sakhi Shejarini

सखी शेजारिणी, तू हसत रहा
हास्यांत पळे गुंफीत रहा

दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघन स्वप्न पसरले
'धूपछांव' मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा

सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित-किरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज, खिन्न घनि लवत रहा

मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित-चाळ त्यास बांधून पहा