Showing posts with label L-मा. दा. देवकाते. Show all posts
Showing posts with label L-मा. दा. देवकाते. Show all posts

सांग सजणा सांग मला रे,Sang Sajana Sang Mala Re

सांग सजणा, सांग मला रे
काय जाहले आज तुला रे

पहिल्या रात्रीचा गंध सुगंधी
पहिल्या स्पर्शाची मस्ती आठव धुंदी
आढेवेढे सोड सांग काय गुन्हा केला

गोरी गोरी तनू माझी जवळ ये ना
नाटक नको करू मिठीत घे ना
ओठांना लाव या ओठांचा प्याला

बहरल्या यौवनाला आज आली ही जाग
भाव उरी भडकला पेटली आग
तुझ्या संगतीचा की रे जीव वेडा झाला

माणसा रे माणसा ठेव,Manasa Re Manasa Thev

माणसा रे माणसा ठेव माणुसकीची लाज
कशासाठी माणुसकीला विसरला रे आज
जय जय विठ्ठ्ल, जय हरी विठ्ठ्ल

जिने तुला देली जन्मोजन्मी साथ
तिचा तरी हात सोडू नको
कुंकू लावियलं तुझ्या नावे भाळी
तिच्या हाती झोळी देऊ नको
जिने तुझ्या घरी पेटवली चूल
तिचे तरी हाल करू नको

आपुल्या हातानं खणुनिया खड्डा
आपुलाच मुडदा गाडू नको
आपुलेच प्रेत खांद्यावर घेत
वाजत गाजत जाऊ नको
साधू संत म्हणती जगी वादळात
रहा बिनधास्त आनंदात

मला म्हणत्यात हो,Mala Mhanatyat Ho

एक पावना कुठून तरी आला
भुलला माझ्या गोऱ्या रंगाला
मी म्हनलं करू नगंस थाट
अशि लावली मी कैकांची वाट
मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी
नाक माझं बाई चाफेकळी, चाफेकळी
मला बघुन लाजतोय ऐना, ऐना, ऐना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

गोरा गोरा सुंदर माझा चेहरा
बटांची नागीन देता पहारा
माझा पदर डोईवर राहिना, राहिना, राहिना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

तो पावणा सारखाच बघतोय् ग बघतोय्
कसा गर्दीत खेटून चालतोय ग चालतोय्
येतो मागून; पुढं काही जाईना, जाईना, जाईना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना



पावना पुन्याचा आलाय्‌ ग,Pavana Punyacha Aalay Ga

पावना पुन्याचा आलाय्‌ ग, बघून येडा झालाय्‌ ग
सोळावं वरीस सरलंय्‌ ग, माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

सकाळच्या पारी सांगावा आला, बघायला येतोय्‌ आम्ही मुलीला
तिन्हीसांजंला पावना आला, बाई बघताच त्याला मी वरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

भरदार छाती रुबाब मोठा, चोरून बघतोय्‌ होईल बोभाटा

अंगावर माझ्या फुटलाय काटा, कळतात बरं का पुरुषाच्या वाटा
कसं काळीज त्याने चोरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

बघुन मला झाला हा येडा, ठरलाय्‌ अमुचा साखरपुडा
आलाय्‌ स्वप्नी ठसलाय्‌ मनी त्याला इश्काच्या जाळ्यात घेरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

तुझी साथ हवी रे रोज,Tujhi Satha Havi Re Roj

तुझी साथ हवी रे रोज मला
नवी बात खुलू दे प्रीतफुला

जशी दिवसामागे रात फिरे
गाणी प्रीतीची ग गात फिरे
दे हाती तुझा रे हात मला
मी देईन सजणा सूख तुला
नवी बात खुलू दे प्रीतफुला

मनी जागे झाले प्रेम खरे
गाली प्रीतीची ही खूण उरे
संसार सुखाची ओढ मला
कधी सोडून जाणार नाही तुला
नवी बात खुलू दे प्रीतफुला

तुजसाठी माझा जीव झुरे
हे स्वप्न मनीचे व्हावे पुरे
झोप येतच नाही रोज मला
किती जागून देऊ साद तुला
नवी बात खुलू दे प्रीतफुला