Showing posts with label L-वसंत शांताराम देसाई. Show all posts
Showing posts with label L-वसंत शांताराम देसाई. Show all posts

कटु योजना KATU YOJANA

कटु योजना ही ।  विधिची ।

अजि साहू कैसा ।  मज बल ना ॥

रतिसम कांता जरि संसारी ।

परि सुख नाही

हीच दुष्ट घटना ॥


Lyrics -वसंत शांताराम देसाई VASANT SHANTARAM DESAI
Music - मा. कृष्णराव MA.KRUSHNRAO
Singer -प्रकाश घांग्रेकर PRAKASH GHANGREKAR
Movie / Natak / Album -GEET

सुखमय आशा,Sukhamay Aasha

सुखमय आशा । विधिने नाशा ।
निशिदिनिं छळिते । घोर निराशा ॥

काव्य कल्पना । भुलवी भुवना ।
अनुभव परि ये । अरसिक ऐसा ।

लहरी अता सुखाच्या,Lahari Ata Sukhachya

लहरी अता । सुखाच्या । करिती तनू रोमांचिता ॥

सदनी येता । जिवलग सखया ।
रमणि मनी ये । हीच प्रफुल्लता ॥

प्रणया नवरुचि देता,Pranaya Nav Ruchi Deta

प्रणया नवरुचि देता । हा विरह रुचिर गमला ।
विरहपीडिता । तृषित मना ॥

मजसम मधुपा । तू गमसि कमला ॥

धावत येई सखया,Dhavat Yei Sakhaya

धावत येई सखया । यदुराया ।
नातरी महिमा जाईल विलया ॥

बघ आचरिला । धर्म जगी मी ।
शिकविलासि जो । तूचि कासया ॥

जर शासन मज । लाज तुला ती ।
ब्रीद राख नीज । समयी अशा या ॥

धवल लौकिका,Dhaval Laukika

धवल लौकिका । मलिन करीत मम जनता ॥

विमला मम कांता । जी जगता दे शुचिता ॥

पतियश नाशील ती का ॥

धन्य तूचि कांता,Dhanya Tuchi Kanta

धन्य तूचि कांता । गमसी करिता क्षमा कांता ॥
नवजन्म घेता । त्वदीय सहवास लाभो । दुजी नच वांछा ॥

तूंचि दिव्यांगना,Tuchi Divyangana

तूंचि दिव्यांगना भारिसी जीवना ॥

तव हा मुखचंद्र । उदित मम मंदिरी ।
जणु भाग्यपूर्णेंदु । जिवाला उरे ॥

गमते सदा मजला,Gamate Sada Majala

गमते सदा मजला । द्वारका वंद्य ।
प्रभुच्या पदांबुजें जगीं । जी होत धन्य ॥

भासत ती मूर्ती बघतां । हा त्यजोनी ।
स्वर्गीचे जणु सिंहासन । प्रभुराज । अवतरला ॥

कांता वंचिता निज पतिता,Kanta Vanchita Nij Patita

कांता वंचिता निज पतिला संसारी ।

कठिण खड्ग न्याय करिल ।

अजि करि धरिता ॥



सदनीं काय वै-यांना ।

देइ ठाव कुलांगना ।

कुलांगारिणी ती पतिता ॥

उपवनिं गात कोकिळा,Upvani Gaat Kokila

उपवनिं गात कोकिळा
ऋतुराजा जीवाचा, दिसला तिज ॥

रसिकराज तिज दिसला
जीव जिवा सांपडला

फुलत चंद्र पाहुनियां कमलाजन ॥