Showing posts with label M-मा. कृष्णराव. Show all posts
Showing posts with label M-मा. कृष्णराव. Show all posts

कटु योजना KATU YOJANA

कटु योजना ही ।  विधिची ।

अजि साहू कैसा ।  मज बल ना ॥

रतिसम कांता जरि संसारी ।

परि सुख नाही

हीच दुष्ट घटना ॥


Lyrics -वसंत शांताराम देसाई VASANT SHANTARAM DESAI
Music - मा. कृष्णराव MA.KRUSHNRAO
Singer -प्रकाश घांग्रेकर PRAKASH GHANGREKAR
Movie / Natak / Album -GEET

छंद तुझा मजला CHHAND TUZA MAJALA

छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला

अशी कशी रे मी, भुलले सांग तुला

संसारी माझ्या येउनिया का ऐसा

हरि का केला घात पुरा,

का असा रे घननीळा

कशास झाले सासुरवाशीण मी रे

उठता बसता तुझेच चिंतन

कुणा म्हणू रे मम स्वामी, नकळे मी

जोवरी तू मनि माझ्या

Lyrics -मो. ग. रांगणेकर MO.G.RANGANEKAR
Music -मा. कृष्णराव MA.KRUSHNRAW
Singer -ज्योत्‍स्‍ना भोळे JYOTSNA BHOLE
Natak -एक होता म्हातारा EK HOTA MHATARA

उपवर झाली लेक लाडकी Upavar Jhali Lek Ladaki

उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली

सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती ?
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली

रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी
मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी
धनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली

स्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरि ती किती !
देशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली

हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन्‌ कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली

इतुके होते तरिही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राम्हणवेषें तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जिवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली

त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली

सारे प्रवासी घडीचे,Sare Pravasi Ghadiche

सारे प्रवासी घडीचे
नांदू सुखे संगती

या दुनियेच्या अफाट हाटी
पडती गाठी-भेटी अवचित
पडती गाठी-भेटी
बोलू संगे, चालू संगे
खेळू नाचू हसू रुसू संगे

पाहू संगे सुख सोहाळे
साहू संगे विजा वादळे
जीव संगे भाव संगे
प्राण देऊ संगती

प्रीति मैत्रीच्या पावन तीर्थी
न्हाऊ, देऊ जिवा सुख शांती

सन्निद्ध जी सेवा,Sannidha Ji Seva

सन्निद्ध जी सेवा, सेवा तीच सुखदा विरही जनाला ॥

सौख्य असे विमल करा, सहजचि मारा मज विरहाला ॥

सनातन नाद हा,Sanatan Naad Ha

सनातन नाद हा भगवाना ॥

साधु जना पहावें, फुलवित दानत आचरित ज्ञाना ।
नाद-निनादे नारदा वदे । शील घे विषय गाना ॥

शर लागला तुझा गे,Shar Lagala Tujha Ge

शर लागला तुझा गे,
बघ जीव झाला वेडापिसा हा ॥

जडे गडे तव ठायी आस ।
बाहुपाशि सौख्य सार मृदुलशा ॥

नको अशी तरि राहू दूर ।
देई गोड चुंबनास मधुरशा ॥

लहरी अता सुखाच्या,Lahari Ata Sukhachya

लहरी अता । सुखाच्या । करिती तनू रोमांचिता ॥

सदनी येता । जिवलग सखया ।
रमणि मनी ये । हीच प्रफुल्लता ॥

लख लख चंदेरी (१),Lakha Lakha Chanderi (1)

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !

झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हा हा !

आनंदून रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हा हा !

राधिका चतुर बोले,Radhika Chatur Bole

राधिका चतुर बोले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

चल प्रीती पंख पसरू
गगनी स्वैर फिरू
गिरीशिखर सागरांना
लंघुनी मेघांना
राधिका चतुर बोले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

न‍उ लाख दिव्य रमणी
मंगलमय गाणी
आळविती गगनी
मधि कांत शांत हसरा
करिती फेर पुरा
ही तेजाची गंगा
चल चल श्रीरंगा
घालु इथे पिंगा
करु प्रेम अमर अपुले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

ये झणिं ये रे माघारी,Ye Jhani Ye Re Maghari

ये झणिं ये रे । माघारी ॥

क्षणभर वळुनीं, बघ मम नयनीं, मूर्ति अपुली ।
कुठवर एकलि वाट पाहू । तुजविण राहू ।
विसरुनि जाशिलही । नवथर प्रीत खुळी ।
जा घेउनिया संगती रे हे मन माझे ॥

तळमळले नयन तुझे जरि । मजला कधी पहाया ।
सुखविन तुजला । नकळत रे राया ।
येउनिया स्वप्निं तुझ्या सखया ॥

मान्य कांत वरिला,Manya Kant Varila

मान्य कांत वरिला हा । रवि राज्य करित ।
मम मनिं निशिदिनि तो हा ॥

धन्य हंसिका । मौक्तिक वांछित ।
खुलवि फुलवि शशि तारका ॥

मराठी असे आमुची,Marathi Ase Aamuchi

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी;

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी



मनरमणा मधुसूदना,Man Ramana Madhusudana

मनरमणा । मधुसूदना ।
मुखी राहो माझ्या
प्रभो! हे नाम सदा ॥

आठविता रे गोकुळीच्या बाळलीला ।
आनंदे नटला जीव हा ।
येईल का रे काळ ऐसा ।
दिव्यतेचा । द्याया सौख्य पुन्हा ॥

मजला घडावी हे देवा,Majala Ghadavi He Deva

मजला घडावी हे देवा तव पदसेवा । सहवास द्यावा ॥

सेवेत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥



भक्तीभाव हा घ्या सेवा,Bhakti Bhav Ha Ghya Seva

भक्तीभाव हा घ्या सेवा
रुचिर रूप तपनांत तापवा
गोड गोड मज बोलवा ॥

अमर कलासी मम देह धरी
सत्य सत्य त्या राबवा ॥

बोला अमृत बोला,Bola Amrut Bola

बोला । अमृत बोला ।
शुभसमयाला, गोड गोड ॥

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।
ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य ॥



प्रियकर वश मजला,Priyakar Vash Majala

प्रियकर वश मजला; विमल यश हेंचि, गुरुपदा देह चढला ॥

स्त्री पुरुषा गुरुता वेतां । विरह-कलह मग शांत झाला ॥

प्रिय जरि हा सहवास,Priya Jari Ha Sahavas

प्रिय जरि हा सहवास मला । आवरी उतावीळ मनाला ।
बंध धर्म सकला ॥

बंधन योगे अमर संसार । चंचल दु:खचि तो अविचार ।
धरीना संतोषाला ॥

पायोरी मैंने रामरतन,Payori Maine Ram Ratan

पायोरी मैंने रामरतन धन पायो ॥

वस्तु अमोलिक दिजे मेरे सद्‌गुरू ।
कृपा करी अन्‌ पायो ॥

जनम जनम की पुंजी बांधी ।
जगमे सभी खो वायो ॥

सत्‌ की नाव खेवटीया सद्‌गुरू ।
भवसागर तर आयो ॥

मीराके प्रभु गिरिधर नागर ।
हरख हरख जस गायो ॥