Showing posts with label L- जगदीश खेबुडकर. Show all posts
Showing posts with label L- जगदीश खेबुडकर. Show all posts

मोरया … मोरया …MORAYA ..MORAYA



हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला, पायावर माथा
डंका वाजं  दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यां-कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -अजय गोगावले AJAY GOGAWALE
Singer -अजय-अतुल AJAY-ATUL
Movie / Natak / Album -उलाढाल (२००८) ULADHAL 2008

उठा उठा हो सूर्यनारायणा UTHA UTHA HO SURYNARAYANA

उठा उठा हो सूर्यनारायणा

थांबली सुवासिनी पूजना

किरणहार हे गुंफित आली

उषासुंदरी धुक्यात न्हाली

नवरंगांची उधळण झाली गगनाच्या अंगणा

विझल्या तारा, वाहे वारा

शोधीत पक्षी चिमणा चारा

घरोघरीच्या अमृतधारा भूषविती गोधना

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -वाणी जयराम WANI JAYARAM
Movie / Natak / Album -सून माझी सावित्री SUN MAZI SAVITRI

पोर मी लहान POR MI LAHAN

पोर मी लहान बालीका अजाण
माझ्या खिडकीत वाकून पाहु नका 
नगं दावूस तोरा माझ्या गुलमोहरा 
हात हातात सजनी देशील कां

आई बापाची लाडकी मी लेक
माझ्या दिमतीला नोकर अनेक
खड्या नजरेचा पहारा
असे माझ्या दारा
दाराच्या आत कधी येऊ नका 

मी बंगालचा  जादुगार
माझ्या मुठीत इद्या हजार   
किमयागारिणं पहारा करुनियां गार 
तुझ्या दरवाज्याला मी देईन धक्का 
कळी ज्वाणीची लागली फुलाया उरी
जीवन तेजात मोहरली काया सारी
माझ्या हृदयाची चिमनी चिवचिव करी
तिच्या नाजुक पंखांना डिवचु  नका
माझ्या ज्वाणीचा अवखळ भुंगा
तुझ्या कळी भवतीनं घालिल पिंगा

मायेचं पाखरू बघ लागलय झुरुं  
प्रीती वाचून ग जीव हा जाईल फुका



Lyrics -जगदीश खेबुडकर
Music -प्रभाकर जोग
Singer -लता मंगेशकर,जयवंत कुलकर्णी  
Movie / Natak / Album -आंधळा मारतो डोळा 

लाज लाजुनी मी LAJ LAJUNI MI

हिरवा शालू हिरवी चोळी
हिरवा चुडा मी ल्याले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

जोडिनं बसता लग्नाला 
मांडी लागली मंडीला
चटकन त्यांनी चिमटा काढला
बावरून मी गेले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

होमा भवतिनं फिरताना 
हात हातामधी धरताना
गचकन त्यांनी हात दाबला
भलतेच केले चाळे
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

रंग खेळता हातनं
विडा तोडिता दातानं 
कचकन त्यांनी ओठ चावला
अंग शहारुन आले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

पहिल्या राती मी रंगात
चंदनाची चोळी अंगात
गपकन त्यांनी मीठी मारिता 
शिनगारात मी न्हाले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -चंदनाची चोळी अंग अंग जाळी CHANDANACHI CHOLI ANG ANG JALI

चंदनाचे दार माझे CHANDANACHE DAR MAZE

दॄष्ट लागावी हे असे
भाग्य आले हे घरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

उजळल्या दाही दिशा 
न्हावुनिया आली निशा
दीप नक्षी कोरताना
तेज आले अंबरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

आगिन फुलाची नक्षी
माझ्या पदरावरती जडवा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो
फटाकडीचा लवंगी चटका
भुईचक्राचा लावा फटका 
नयन बाणांची आतषबाजी
दिलावरी भिड़वा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

भाग्य लेणं लेऊनी मी
वाण हाती घेऊनी
संसार मी मांडताना
हात होई लाजरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

गरम गुलाबी नवी नव्हाळी  
रात जागुनी करा दिवाळी
मदन राजाच्या शीनगराची
नशा मला चढवा हो 
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

निरांजन लोचनी
दोन ज्योती लावुनी
अशी ओवाळींन देव आज आले मंदिरा 
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम  RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर , शोभा जोशी  USHA MANGESHAKAR,SHOBHA JOSHI
Movie / Natak / Album -लक्ष्मी  LAKSHMI

राया जरा घोडयाला घाला लगाम RAYA JARA GHODYALA GHALA LAGAM

लई चौखुर सुटलाय बघा
दरी डोंगरात देईल दगा
अन नीती कमरंचीसोडू नगा 
मुक्काम रहयला दूर साजना
हितच फुटला घाम
अहो राया
राया जरा घोडयाला घाला लगाम

लई मस्तिनं फुरफुर करतो
माती उकरून रिंगाण धरतो
अंदन मधनं झाडीत शिरतो 
अवती भवतिनं धुंदीत फिरतो 
नखरा ह्याचा लई धोक्याचा
न्यारंच ह्याचं काम       
 अहो राया 
राया जरा घोडयाला घाला लगाम
भ्या वाटतंया उतरा खाली 
नवेपणाची भोवळ आली
ह्या द्वाडानं किमया केली 
नाक घासतोया गुलाबी गाली
रगारागानं विकून टाका 
परत मागा दाम 
राया जरा घोडयाला घाला लगाम

Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -ज्योतिबाचा नवस  JYOTIBACHA NAVAS

सजनी ग भुललो मी SAJANI G BHULALO MI

सजनी ग, भुललो मी ,काय जादु केली
बघुन तुला जीव माझा होई वर खाली
सजना रे, काय सांगु ,कुणी जादु केली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

काल मला याची बाई जान नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतिया कशी लाजाळूची येली
अल्लड चाळयाचीखोडी कुठं गेली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

नकोस घेऊ विळख्यात सजना असा
बघत्यात झाडी येली भर दिवसा 
डोंगराची मैना कशी एकांताला भ्याली
कळी ही गुलाबी सुगंधात न्हाली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

लपेना ही हुरहुर आज पदरी
शालू चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तूं लक्ष्मीच्या  चाली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -बाळ पळसुले BAL PALSULE
Singer -उषा मंगेशकर,महेंद्र कपुर  USHA MANGESHAKAR, MAHENDR KAPOOR
Movie / Natak / Album -भिंगरी  BHINGARI

आज गालात खुदकन हसले AAJ GALAT KHUDAKAN HASALE

आज गालात खुदकन हसले
बाई हसले ,हुं    हुं     हुं     कां ?
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग
आ       आ      आ

या वारूचा गुलाबी रंग
दोन्ही बाजुला सपनांचे पंख
चाल याची दुडकी ग
नजर ह्याची लाडकी
,हुं    हुं     हुं
ह्याला बघून मी बावरले
ग ह्याला बघून मी बावरले
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग

आ       आ      आ
भान हरपून गेलं मनाच
कोड़े सुटेना तरुणपणाचे
काय कुणा सांगू मी
काय मागु मी
माझ्या काळजात काहीतरी डसलय
आं   ?
माझ्या काळजात काहीतरी डसलय
काल पिरतीच्या वारुवरी
मी    बसले   बाई     ग





Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम  RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -वारणेचा वाघ  WARANECHA WAGH

रंग रंग रंगात RANG RANG RANGAAT




रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग

घडी घडी बदलते रंग ,होऊन दंग ,नर्तकी नाचते , नर्तकी नाचते 
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग
रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग
ऎळ कोट ऎळ कोट जय  मल्हार

भंडारयात  न्हाऊन आली ,भंडारयात  न्हाऊन आली
वाघ्या मुरळीची जोड़ी जमली ,वाघ्या मुरळीची जोड़ी जमली
राती  घंटी छुन  छुन  बोले ,राती  घंटी छुन  छुन  बोले
जशी तालात  तिमड़ी घुमली 
मल्हारी मल्हारी देव मल्हारी माझा
घडी घडी बदलते रंग ,होऊन दंग ,मुरळी नाचते , मुरळी  नाचते 
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते

बोमबिल  ,बांगड़ा ,सुरमई ,पापलेट इकाया आलीया  मसोली 
बोमबिल  ,बांगड़ा ,सुरमई ,पापलेट इकाया आलीया  मसोली 
तंग तंग तारेत ,लाल लाल रंग ,उरात कसतोया कटोली 
तंग तंग तारेत ,लाल लाल रंग ,उरात कसतोया कटोली 

खाली  नको टाकुया मी घावणार नाय 
खाली  नको टाकुया मी घावणार नाय 
अशी तशी नाय मी भोली खुली
घडी घडी बदलते रंग ,होऊन दंग ,कोलीन नाचते , कोलीन  नाचते 
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते

तुझी अक्कड़ बाजी मिशी ,तुला बघून झाली ख़ुशी
तुझी अक्कड़ बाजी मिशी ,तुला बघून झाली ख़ुशी
तुझी अक्कड़ बाजी मिशी ,तुला बघून झाली ख़ुशी
तसा शालुला फुलला फेटा ,तसा शालुला फुलला फेटा
तुझा फेटयात हजारो नोटा , तुझा फेटयात हजारो नोटा
तुझा फेटयात हजारो नोटा  

घडी घडी बदलते रंग ,होऊन दंग ,लावणी नाचते , लावणी  नाचते 
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
लाज डोळयात ,गोरया गालात खुदुखुदु हसते
रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग
रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग
रंग रंग रंगात,न्ह्यारया  ढ़गात तांडा आलाय ग 
ताल हाय सुरात ,सुर हाय तालात ,बेसुर झालाय ग


Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -अच्युत ठाकुर ATCHYUT THAKUR
Singer -सुरेश वाडकर ,वैशाली सामंत  SURESH WADAKAR,VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -पैज लग्नाची  PAIJ LAGNACHI

ढोल घुमला DHOL GHUMALA



ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला

तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
त्याला सूराचा  पिसारा फुलला 
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला 
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन

या ढोलावरी हातांची पाखर फड़फड़ली
या ढोलावरी पायांत बिजली फड़फड़ली
या ढोलावरी हातांची पाखर फड़फड़ली
या ढोलावरी पायांत बिजली फड़फड़ली
तुझी वाचे  मुरकी  ,मी घेईन गिरकी 
तुझी वाचे  मुरकी  ,मी घेईन गिरकी
पुरया  नशाचा झोका झुलला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन

या डोळयामधी   गुपित अडक मी जपल
या मनामधी कशी  मी सांगू काय लपल
या डोळयामधी   गुपित अडक मी जपल
या मनामधी कशी  मी सांगू काय लपल
जरा समजून घे ,जरा उमजून घे
जरा समजून घे ,जरा उमजून घे  
भान हरपुन जीव हा रमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन
ला ला ला ला ला ला ला ला

तू भोळा खुळा कलेच मिळाल वरदान
मी तुझासाठी झेलून घेतलय आव्हान 
तू भोळा खुळा कलेच मिळाल वरदान
मी तुझासाठी झेलून घेतलय आव्हान 
जाता जाता अशी तुझी करेन ख़ुशी    
जाता जाता अशी तुझी करेन ख़ुशी 
नाद घुंगरा चा तुझावर भूलला

ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला

तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
त्याला सूराचा  पिसारा फुलला 
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला 
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन


Lyrics - जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -अच्युत ठाकुर ATCHYUT THAKUR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -पैज लग्नाची  PAIJ LAGNACHI

मोहरले मी सजना MOHARALE MI SAJANAA




मोहरले मी सजना,मोहरले मी सजना
मोहरले मी सजना,
मोर पंख हे अलगद फिरता
मोर पंख हे अलगद फिरता
थरथरले सजना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना
थीरक थीरक मन उलकित झाले
अलग बिलग हो का तराना
धूम तन तना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना

स्वप्न कमल हे उच्च  सरोवर
अवघा परी तय नयन मनोहर
स्वप्न कमल हे उच्च  सरोवर
अवघा परी तय नयन मनोहर

कलावती ही नरतल करिते
कलावती ही नरतल करिते
फुल कमल चरना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना

परी वर्तन करले ,अंतरंग रंगात रंगले 
नव नविते अवति भवती फिर फिरते
चहत करी संकेत कि ति मदना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना

लक्ष दीप हे ,उजळुनी आले
प्रकाशात हे मंदिर न्हाले
लक्ष दीप हे ,उजळुनी आले
प्रकाशात हे मंदिर न्हाले
तेजोमय हे  प्रीत मिलन 
तेजोमय हे  प्रीत मिलन
वाटे स्वर्ग  उडा आ आ

मोहरले मी सजना,मोहरले मी सजना
मोहरले मी सजना,
मोर पंख हे अलगद फिरता
मोर पंख हे अलगद फिरता
थरथरले सजना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना
मोहरले मी सजना,मोहरले मी सजना




Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -अच्युत ठाकुर  ACHYUT THAKUR
Singer -सुरेश वाडकर ,अनुराधा पौडवाल SURESH WADAKAR,ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -पैज लग्नाची  PAIJ LAGNACHI

रुणुझुणुत्या पाखरा RUNUJHUNUTYA TYA PAAKHARA

रुणुझुणुत्या पाखरा
जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी
तिला लिंबलोन करा

गवर गौरी ग गौरी ग
झिम्मा फुगड़ी खेळु  दे
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे

मी हो बहीन लाडकी
हेच पानाच्या तबकी
दिली कुर्हार्डीची ओवळणी
तोच भाऊ खरा
माया ममतेची ममतेची
आई मला भेटु दे
माहेरपनाच ,पणाच
रुनुझुनूत्या पाखरा

गवर  गौरी ग गौरी ग
झिम्मा फुगड़ी खेळु  दे

कशी माहेरला येऊ
शिवेवरी उभा भाऊ
गेला उगड मातेची
ओटी भरून माघारा
जीव लावुनी जीवाला
टीळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जन्मात
नदी भेटु दे सागराला
रुनुझुनूत्या पाखरा



Lyrics -जगदीश खेबुडकर   JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -टिळा लाविते रक्ताचा TILA LAWITE RAKTACHA

काजळाच डोळ मदनाच जाळ KAJLACH DOL MADNACH JAL

काजळाच डोळ मदनाच जाळ
त्यात इश्काच पाखरू फसलय ग 
टकमका बघत बसलय ग 

तीळ काळा नि मुखड़ा गोरा
शिरला पदरात पिसाट वारा 
उराला धोका वाडलाय ठोका
मनात कोण तरी ठसलय ग

केला शिनगार केला साज
अंग अंगी बहरली लाज
ज्वाणीत न्हाले लेन मी ल्याले
कमरेला काय तरी कसलय ग

माझ्या मांग ही दुनिया फिरती
परी माझी तुम्हावर पिरती
विळखा घाला लाडे लाडे बोला
काळजाला काळीज डसलय ग

Lyrics -जगदीश खेबुडकर   JAGDISH KHEBUDKAR
Music -बाळ पाळसुले  BAL PALSULE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव  तस भराव  KARAV TAS BHARAV

ज्वाणीच्या पाण्यात मासोली JWANICHA PAANYAT MASOLI

ज्वाणीच्या पाण्यात मासोली
मी  मासोली
पर वैताग आनलाय बगळ्यांनी
अस !आत्ता हिचा !
मला घेराव घातलाय सगळ्यांनी
हिला घेराव घातलाय सगळ्यांनी

खाली कशी जाऊ तर कशी येऊ
गिरकी मारु की फिरकी घेऊ
घे की !
मला भवतिन वेढलाय जाळयांनी
हो जाळयांनी
मला घेराव घातलाय सगळ्यांनी
हिला घेराव घातलाय सगळ्यांनी

शील कुणी घातलाय खाकरुण ग
तकमक बघते मी बावरून ग
कुणाकडे
मला खाणाखुणा  करत्यात डोळ्यांनी
हो डोळ्यांनी
मला घेराव घातलाय सगळ्यांनी
हिला घेराव घातलाय सगळ्यांनी

आकड़यांचा गळ कुणी टाकल का
झकतो की !
आज चळवळ केलीया कोळयांनी
हो कोळयांनी
मला घेराव घातलाय सगळ्यांनी



Lyrics -जगदीश खेबुडकर   JAGDISH KHEBUDKAR
Music -बाळ पाळसुले  BAL PALSULE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव तस भराव  KARAV TAS BHARAV

काय सांगु रातीच बारा वाजल KAY SANGU RAATRICH WAJAL BARA


टिक टिक टिक टिक टिक टिक
तुझा काळजाचा घड्याळात
किती वाजल ?ग किती वाजल
काय सांगु रातीच बारा वाजल !
झाली मध्यान रात ग बाई
अजुन रयाचा पत्ता न्हाई
वारा बी मेला फिरकना अनं
घामानं अंग मांझ लई भींजल
काय सांगु रातीच बारा वाजल
हिचा काळजाचा घड्याळात
 बारा वाजल धनी,बारा वाजल!
काटा सरकत जाई पुढ़
डाव्या डोळ्यांची पापणी उड़
 दार खिड़क्या बंद आसोनी
कोन्यात कुणीतरी कुजबुजल
बाई बाई कुजबुजल
काय सांगु रातीच बारा वाजल !
हिचा काळजाचा घड्याळात बारा वाजल
चोर कोन्यात होता उभा
त्यानं माझ्यावर धरला दबा
भिउनी सख्याला मिठी मरिली
बघुनी त्याला मांझ डोळ लाजल
काय सांगु रातीच बारा वाजल !


Lyrics - जगदीश खेबुडकर   JAGDISH KHEBUDKAR
Music -बाळ पलसुले  BAL PALSULE
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव तस भराव KARAV TAS BHARAV