सावलीही अशात हसते
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते
बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई
मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनि नयनी अश्रू पोरके
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....
जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीति
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता ..... अस्मिता .....
No comments:
Post a Comment