Showing posts with label M-गोविंद बल्लाळ देवल. Show all posts
Showing posts with label M-गोविंद बल्लाळ देवल. Show all posts

हा खचित दिसे मम,Ha Khachit Dise Mam

हा खचित दिसे मम भाग्यकाल ।
मोहुनि त्यांच्या कपटभाषणा ।
नाहि सोडिलें सदन काल ॥

श्रीयुत हे संभाविति दाविति ।
परिं आचरणीं उलट चाल ॥

भल्या, हीन मग गणिका आम्ही ।
उघड घालितो मोहजाल ॥

स्वार्थी जी प्रीति मनुजाची,Swarthi Ji Preeti Manujachi

स्वार्थी जी प्रीति मनुजाची सहज ती ।
परि साधे जो स्वार्थ परार्थी, उत्तम तो गणिती ॥

स्वार्थ परार्थाइतुका असतां, मध्यम त्या म्हणती ।
ज्यांत न जनहित त्या स्वार्थाला साधु अधम वदती ॥

स्वकर शपथ वचनिं,Swakar Shapath Vachani

स्वकर शपथ वचनिं वाहिला ।
उगिच कां तुवां ? ।
निजतनु दिधली मला, तो काय,
पोरखेळ नवा ॥

पसरिली माया लटकिच कां ती ।
वरिलें का धरुनी साक्षी त्या माधवा ॥

सुंदर खाशी सुबक,Sundar Khashi Subak

सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न,
कृशहि न, वय चवदाची ॥

नयन मनोहर वनहरिणीचे,
नाक सरळ जशि कळि चाफ्याची ॥

भृकुटि वांकड्या, केश सडक मृदु,
दंतपंक्ति ती कुंदकळ्यांची ॥

ओंठ पोवळी, हनु चिंचोळी,
लालि गुलाबी गालांवरची ॥

सांवळा वर बरा गौर,Sawala Var Bara Gaur

सांवळा वर बरा गौर वधुला ।
नियम देवादिकीं हाचि परिपाळिला ॥

गौर तनु जानकी राम घननीळ तो ।
रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा ।
शुभ्र गंगा नदी सागराला वरी ।
वीज मेघास ती घालि माळा ॥

संशय का मनिं आला,Sanshay Ka Mani Aala

संशय का मनिं आला । कळेना ।
कारण काय तयाला ॥

आळ वृथा कीं चित्र दिलें मी
कोणा परपुरुषाला ॥

कोपुनि गेले ही मज लागे
हळहळ घोर मनाला ॥

सौख्यसुधा वितरो,Saukhya Sudha Vitaro

सौख्यसुधा वितरो । सदा नव । तुम्हा सदाशिव ।
हिमगिरिजा धाव । साधुजनांचा ताप परिहरो ॥

स्वकरें निज शिरिं गंगा बसवी । मत्सरभावें सतीस रुसवी ।
शशि लक्षिसि तूं अशिवे केवीं । पुसे रुसे तो भविं तारो ॥

सौख्यसुधा वितरो,Saukhya Sudha Vitaro

सौख्यसुधा वितरो । सदा नव । तुम्हा सदाशिव ।
हिमगिरिजा धाव । साधुजनांचा ताप परिहरो ॥

स्वकरें निज शिरिं गंगा बसवी । मत्सरभावें सतीस रुसवी ।
शशि लक्षिसि तूं अशिवे केवीं । पुसे रुसे तो भविं तारो ॥

सौख्य पूर्ण देवो तुम्हां,Saukhya Purna Devo Tumha

सौख्य पूर्ण देवो तुम्हां श्रीगिरिजेचा कांत तो ॥

केश धवल हे विधुकांतीनें । किंवा कांते भस्मलेपनें ।
नसे ग्रस्त मी वार्धक्यानें । असे हंसत जो सांगतो ॥

सुकांत चंद्रानना पातली,Sukant Chandranana Patali

सुकांत चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनी ॥
कटाक्ष खरशर सोडुनि भेदित हृदयचि गजगामिनी ॥
रदन दिसति जणुं शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले ॥
कुरळ केश शिरिं सरळ नासिका नेत्र कमलिनीदलें ॥

साम्य तिळहि नच दिसत,Samya Tilahi Nach Disat

साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ।
नाव तरी कोरवा शिरावर ।
ओळखु येइल चित्र कुणाचें ॥

मजजवळि असे याहुनि सुंदर ।
प्रीतिचितारिणी करिचें ।
प्रतिबिंब सुबक या मूर्तींचें ॥

सार्थचि ते वदती,Sarthachi Te Vadati

सार्थचि ते वदती । लोकीं ।
प्रारब्धाची गति न कळे ती ॥

सारसादि जे बलि भुक्षुनियां ।
क्रीडत होते सदनांगणिं या ।
वाढे सांप्रत तृण त्या ठाया ।
पुण्यवली हा कीटक खाती ॥

सदय किती कोमलमति,Saday Kiti Komalmati

सदय किती कोमलमति रेवती ती ।
शोभे ही काय तिला निष्ठुरा कृती ॥

कानिं कुणीं विष वमिलें मानुनी खरें ।
कुपित होय भेट न घे प्रेम सांडिती ॥

सखे शशिवदने,Sakhe Shashivadane

सखे शशिवदने ।
किती रुचिर, बिंबसम अधर,
परम सुकुमार ॥

अधरसुधा तव पिउनी कसें गे ।
अयशोविष मी सेविन सांगे ।
विधुकरशुचिरदने ॥

श्वानाहुनि अति नीच,Shvanahuni Ati Neech

श्वानाहुनि अति नीच तुम्ही रे, स्वार्था मांजरसे टपतां ।
जंबुकगुरु जनवंचनकामीं । साधुबकापरि वरि दिसतां ॥

वेदशास्त्रसंपन्न म्हणवितां । केलि मुखोद्गत ती गीता ।
तत्व तयांतिल कळे हेंच का । सत्यपराङमुख कां होतां ॥

श्वान नाचतें पुच्छ घोळितें, चाटि अंग तुकड्याकरितां ।
तसें नाचतां आर्जव करितां, रुचे समर्था तें वदतां ॥

तो म्हणे अश्व वृषभाला । तुम्ही मान तुकवितां त्याला ।
तो म्हणे अहो रवि मेला । लावितां पदर डोळ्यांला ।
मी कसा तरुण रंगेला । म्हणतांच मदन अवतरला ।
नरनंदी हे लक्ष्मीनंदन । त्यांत भोंवतीं तुम्हि जमतां ।
श्वान काक बक ढोंगी सोंगी । दिवटी त्याच्या करि देतां ॥

शंभो शिवहर करुणाकर,Shambho Shivahar

शंभो शिवहर, करुणाकर
हे विश्वेशा, गौरीप्रियकरा ॥

अज्ञानी बलहीन आम्ही
शरणागत तव चरणां
धरि शिरिं करुणयुत कर ॥

मार्गा आम्हां सर्वपरी ।
हे शशिमौली, तू सांभाळी,
जय काळीश्वर ॥

शंकरपद वंदि आधीं,Shankarpad Vandi Aadhi

शंकरपद वंदि आधीं । मग नत बलवंतपदीं ॥

वाग्देवीकंठमणी । प्रतिघाते ज्ञानतरणि ।
रसगंगा यद्वाणी । नमितों ते सुकवि हृदीं ॥

शिणवू नको कंठ असा,Shinavu Nako Kantha Asa

शिणवू नको कंठ असा ।
तृषित न मी बोधरसा ।
ढोंग्या न राहीं उभाही, जरासा ॥

साधु न तुम्ही, भोंदू चोर ।
धूर्त कपटी शठ कठोर ।
पाडितसां व्यसनिं थोर ।
देव खुळ्या स्त्रीपुरुषां ॥

वाटुं ना द्यावा विषाद,Vatu Na Dyava Vishad

वाटुं ना द्यावा विषाद चित्ता ।
सत्य दिसे तें वदतें आतां ।
वयें आजोबा माझे दिसतां ।
नात दिसे मी ही ॥

लोचनांबुधारांनीं हे,Lochanabudharani He

लोचनांबुधारांनीं हे पयोधर ओले ।
कोठुनि आलिस मज ताराया ।
मृत पुरुषा जशि संजिवनी ये झट उठवाया ॥

तुजसाठीं जो बंध पावला ।
तोचि देह त्वां विमुक्त केला ।
प्रिय संगतिचा प्रभाव कळला ।
जीवित मजला पुनरपि आलें ॥