Showing posts with label M-विश्वनाथ मोरे. Show all posts
Showing posts with label M-विश्वनाथ मोरे. Show all posts

वेगळ्या जगात या VEGALYA JAGAT YA

वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले

वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

भरारून झेप घेई पाखरू मनाचे
दाही दिशा मोकळ्या या बंध ना कुणाचे
स्वप्‍न आज प्रीतीचे लोचनांत जागले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले

झाड-वेल-फूल-पाने कुजबुजू बोलती
तुझे-माझे गुपित हे कानामधी खोलती
एकांती संगतीचे वेड जणु लागले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

झोका घेई फांदीवर प्रीत माझी साजणा
मिठीमधे रेशमाच्या येशील का सांग ना?
स्पर्श हा नवानवा रोमरोम झिंगले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHVNATH MORE
Singer -आशा भोसले,सुरेश वाडकरAASHA BHOSALE,SURESH WADEKAR
Movie / Natak / Album -बंदिवान मी या संसारी BANDHIVAN MI YA SANSARI

स्वप्‍नात साजणा SWAPNAT SAJANA


स्वप्‍नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरांत चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतिची बाग, प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता
मधुमीलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?



Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHVNATH MORE
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -गोंधळात गोंधळ GONDHALAT GONDHAL

उठ रे राघवा UTH RE RAGHAWA

उठ रे राघवा
उघड लोचन आता

सूर्य क्षितिजावरती कांचनाच्या रथी 
रत्नकण सांडिले या सुनिर्मय पथी
देव प्राचीवरी उधळिती वैभवा   

पांखराचे गळे जाहले मोकळे
किरण पाण्यावरी उतरले कोवळे
उमलत्या पाकळ्या जाग ये राजीवा

जाग रे राजसा संपली ही निशा
गंध चोहिकडे उजळल्या दशदिशा
तेज आनंद रे तूच माझ्या जीवा


Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAWAKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHWANATH MORE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU

हा सागरी किनारा HA SAAGRI KINARA


हा सागरी किनारा, हा सागरी किनारा,
ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा,  ओला सुगंध वारा,

ओल्या मिठीत आहे ,हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा,ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो  ,अंगावरी शहारा,अंगावरी शहारा
हा सागरी किनारा,ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
हा सागरी किनारा

मी कालचीच भोळी,मी आजचीच येडी ,इथेच वेगळी का ,आजचीच व गोडी
पाउल … ही पडावे
मी कालचीच भोळी,मी आजचीच वेडी ,इथेच वेगळी का रे,आजचीच व गोडी
पाउल … ही पडावे,पाउल … ही पडावे,

मन फुल घेई इशारा,ओल्या मिठीत येतो,अंगावरी शहारा
अंगावरी शहारा……   ओ… हा सागरी  किनारा

 होते  अजान तामी,ते छेडले तराने
 होते  अजान तामी,ते छेडले तराने
 स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाने
 हा रोम रोम जाळी ,हा रोम रोम जाळी
 दाटून गर्द सारा,ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा,रेशमी निवारा
 हा सागरी किनारा

बोलु मुके पनाने,होकार ओठ देती
नातीत ना मनांचे,ये एकरूप होती
एकात नात दोघ,फुलवून हा पीठारा
ओल्या मिठीत येतो,हा अंगावरी शहारा,अंगावरी शहारा
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा,हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा




Lyrics-जगदीश खेबुडकर  JAGDISH KHEBUDKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHWNATH MORE
Singer -सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल  SURESH WADKAR,ANURADHA PAUDWAL
Movie / Natak / Album -असला नवरा नको ग बाई ASLA NAVRA NAKO G BAI 

स्वप्नात साजणा येशील का,Swapnat Sajana Yeshil Ka

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता
मधुमीलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

सुंबरान गावू चला,Sumbaran Gavu Chala

सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

भल्याभल्यास्नी सोसंना ही जवानीची आग
काय करामत सांगू हिची लई न्यारी धग
ऋषीमुनी बी पोळलं असा इश्कबाजीचा संग
भली भली भुलली गा कथा त्याची लावू रे
(बिरोबाच्या नावानं चांगभलं)
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

विश्वामित्र बसला व्हता भगवंताच्या जपाला
डोळं मिटून ध्यान लावं रानावनात तपाला
आली मेनका नाचत तिच्या भुलला रूपाला भुलला रूपाला
तवाच्या गा येळेचा ह्यो पडताळा दावू रे
(बिरोबाच्या नावानं चांगभलं)
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

गौतम ऋषीची होती अहिल्या बाईल
राजा इन्द्रानी तिला डोळं भरून पाहिलं
पतिरूप घेऊन तिला एकांती त्यानं भोगलं त्यानं भोगलं
मोठंपणा घसरला याद त्याची ठेवू रे
(बिरोबाच्या नावानं चांगभलं)
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

असा व्हता पराशर मुनी त्याला दिसली मत्स्यगंधा
साधुपणाला झाली गा तिथं कशी मदनाची बाधा
तिला भिजली बगुन तिच्या लागला की नादा लागला की नादा
किती किती उदारणं सांगा अशी देवू रे
(बिरोबाच्या नावानं चांगभलं)
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

नर-नारीची घातली अशी जल्माची गाठ
किसनदेवाच्या बायका सोळा हजार एकशे आठ
तिच्या शिणगाराचा छंद उभ्या दुनियेला पाठ दुनियेला पाठ
पुराणाचा दाखला ह्यो कलियुगी घेऊ रे
(बिरोबाच्या नावानं चांगभलं)
सुंबरान गावू चला सुंबरान गावू रे
या शेकोटीच्या उबिला गा रातभर ऱ्हाऊ रे

सावध हरिणी सावध,Savadha Harini Savadha

सावध हरिणी सावध ग, करील कुणी तरी पारध ग

रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी
घातक तुजला तुझी मोहिनी, सावध

उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे
थरथर काळीज हलते रमणी, सावध

मादक धुंदी तुझीच सगळी, दिशात भरुनी नभात चढली
मोहाच्या क्षणी झापड नयनी, सावध

शब्द शब्द जपून ठेव,Shabd Shabd Japun Thev

शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी

काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी

साक्ष लाख ताऱ्यांची
स्तब्ध अचल वाऱ्याची
ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी

विनायका हो सिद्धगणेशा,Vinayaka Ho Siddhaganesha

विनायका हो सिद्धगणेशा !
रंग सभेला या तुम्ही या

पक्षी गाती घरट्यांमधुनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु-तोमर
नाग कटिला बांधुन या

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या

आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊन या

लावणी भुलली अभंगाला,Lavani Bhulali Abhangala

मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला
लावणी भुलली अभंगाला

आत्मरूपाची येता प्रचिती
सौंदर्याने नटली धरती
शाल भक्तिची लेवुन भेटे राधा कृष्णाला

अभंग ओवी भारुड गौळण
तशी लावणी यावी बहरून
पुरुषार्थाला चेतवुनिया उधळी रंगाला

लई बाई लबाड दिसतोय ग,Lai Bai Labbad Disatoy Ga

माझ्याकडं बघून, डोळा बारीक करून
पाहुणा गालात हसतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

उगाच मिशिला देतुया पीळ,
तोंडानं हलकेच घालतुया शीळ
पुन्हा पुन्हा बघुन, छाती पुढे काढून,
उगाच ऐटीत चालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

सकाळच्या पारी पाण्याला जाता
उभा राहून ग रोखतुया वाटा
जरतारी फेटा बांधुन मोठा
रुबाब अपुला दावतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

पाण्यानं भरुन घेता ग घागर
हिसळून पाणी भिजतुया पदर
मदनाचा बोका घेतुया झोका
मलाच कोड्यात घालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

राया मी रंभा की,Raya Mi Rambha Ki

चंद्रकलेची घडी मोडली, सांगा हो दिसते कशी ?
राया मी रंभा की उर्वशी ?

अवखळ चंचल माझे यौवन
अंगावरती आले बहरून
अर्ध्याराती उरात माझ्या होई कासाविशी
राया मी रंभा की उर्वशी ?

दुनियेत साऱ्या माझ्यावानी
गावंल का हो दुसरं कोनी
चुकुन पडलं तुमच्या हाती सोनं बावनकशी
राया मी रंभा की उर्वशी ?

मनासारखं माझ्या घडु द्या
जळतिल त्यांना खुशाल जळु द्या
नजरेमधला भाव निराळा तुम्हांस दावू कशी ?
राया मी रंभा की उर्वशी ?

राया मला जवळी घ्या ना,Raya Mala Javali Ghya Na

तुमच्यावरती मीच भाळले, घडला माझा गुन्हा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

नेसले आजला शालु हिरवा नवा
सहवास राजसा तुमचा मजला हवा
रात चांदणी मोत्यावाणी, येळ चालला सुना
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

घ्या विडा केशरी माझ्या हातातुनी
ऐन्यात पाहते मुखडा न्याहाळुनी
तुमच्या हाती हात गुंफिता, मदन करितो खुणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

स्वभाव तुमचा ठसला माझ्या मनी
मज आवडते ही संगत तुमची धनी
राघु संगे मैना लाडकी, मलाच तुमची म्हणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

रचिल्या कुणि या प्रेमकथा,Rachilya Kuni Ya Premkatha

रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

नभि दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतिल पार पळाले, त्यागि तिज पाहता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट खुळी पोर ती
कशि उमलली गीत लाडके वाऱ्याचे ऐकता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

नवपर्णांनी पूर्ण बहरला
वृक्षराज हा गगना भिडला
तशी तयाला दे आलिंगन कोमल पुष्पलता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

म्हण भाबडी तू,Mhan Bhabadi Tu

म्हण भाबडी तू, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली

जीवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासामाजी श्वास मिसळुनी
रुळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी

तव बाहुंच्या क्षितीजामधले
जग दोघांचे मीच निर्मीले
डोळस माझे प्रेम आंधळे
जडले मन हे पडले गळी

पुरुष जातही फसवी बाई
म्हणणारे कुणी म्हणोत काही
फसव हवे तर तूच मला,
ही उडी घेतली मोहजळी

मनोगतांचे उंच मनोरे,Manogatanche Unch Manore

मनोगतांचे उंच मनोरे सांग कुणी रचिले
आज लोचनी संसाराचे स्वप्न मला दिसले

ही वळणाची वाट असावी हिरव्या कुरणावरी
फुलझांडावर रोज उडाव्या कारंजाच्या सरी
उभे मधोमध एक सानुले घरकुल माझे वसले

सखा सोबती जवळ बसावा एकांती येऊनी
अंग चोरुनी दूर उभी मी बावरलेल्या मनी
या भेटीच्या आभासाने खुदकन मी हसले

या चित्राचे रंग भरावे तूच आपल्या हाती
याच घडीला अशा जुळाव्या अपुल्या रेशीम गाठी
माझ्या पुढती इंद्रपुरीचे सुख कोठे कसले



मनात नसता काहि गडे,Manat Nasata Kahi Gade

मनात नसता काहि गडे
का प्रीत तयावर तुझी जडे ?

मंदिरात मी हात जोडीता
अनोळखी तो जवळी येता
बघता बघता हरवुन जाता
का नेत्रपाखरू तुझे उडे ?

किंचित हसता, किंचित फसता
रूप देखणे, प्रीत लाजता
विसरेना ते विसरू जाता
का उघड्या नयनी स्वप्न पडे ?

शतजन्माचे बंधन बांधुन
हिरवे कंकण करात घालुन
प्रीत तिकडची कुंकु लाविता
का हळदीचे ते ऊन पडे ?

भंगलेल्या त्या स्मृतींना,Bhangalelya Tya Smrutina

भंगलेल्या त्या स्मृतींना आळवीतो मी पुन्हा
हाच का माझा गुन्हा?

भाववेडी रम्य प्रीती स्वप्न अपुले ते बसंती
संपले सारे तरी मी आठवीतो त्या खुणा

रंग विरला भावनांचा बहर सरला जीवनाचा
घोळवीतो तीच गाथा गिळुनि साऱ्या वेदना

दु:ख माझे हे गुलाबी त्यातली धुंदी शराबी
शोधितो त्यातून विरल्या प्रीतिच्या संवेदना

प्रेमरंगी रंगता,Prem Rangi Rangata

प्रेमरंगी रंगता, आनंद पसरे दशदिशा
अमृताचा ओघ वाहे, जीवनी फुलते उषा

कमलपुष्पातील तंतु, तेवि नाजूक बंधने
जीव-जीवा भेटण्याला धावती त्या ओढीने
प्रेम देता लाभते साऱ्या सुखाची मंजुषा

पर्णपाचू सावळा सावळा,Parna Pachu Savala Savala

पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा
मी वारकरी आगळा

समानतेच्या विहिरीमधली पुण्याईची चंद्रभागा
न्हाऊ घालते, पावन करते चराचरातील पांडुरंगा
पाटामधुनी तीर्थ चालले, पिकवित कांदा, भाजी, मुळा

मणिमोत्यांचा मंदील बांधुन डुलत शिवारी राव जोंधळा
विठ्ठल नामे कणकण टिपतो पाखरांचा हसरा मेळा
उसात भरता रसाळ गोडी मोर सांगतो निळा

तीर्थरूप त्या प्राणपित्याची मीच समाधी बांधलेली
भावभक्तिची फुले वाहिली हात जोडून सांजसकाळी
या मातीचा अबिर कपाळी, भक्त पुंडलीक पुत्र खुळा