Showing posts with label M-वसंत देसाई. Show all posts
Showing posts with label M-वसंत देसाई. Show all posts

ती सुंदरा गिरिजा TI SUNDARA GIRIJA

ती सुंदरा गिरिजा

आठवते मज मृदुला गिरिजा

ती ललना चिरयौवना

मृगलोचना बिंबाधरा प्रणय चतुरा

ती सुंदरा गिरिजा

आठवते मज मृदुला गिरिजा

ती ललना चिरयौवना

मृगलोचना बिंबाधरा प्रणय चतुरा


Lyrics -विद्याधर गोखले VIDYADHAR GOKHALE
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -पं. राम मराठे PANDIT .RAM MARATHE
Movie / Natak / Album -जय जय गौरीशंकर JAY JAY GAURISHANKAR

SNAN KARITI LOCHANE स्‍नान करिती लोचने

स्‍नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हापुन्हा
शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
नील कमल पाहता तूच भाससी मना

तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

लोचनांस लागले वेड रे निळेनिळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सांवळे
जन्मपूष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना


Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -स्वयंवर झाले सीतेचे SWAYAMWAR ZALE SEETECHE

हेच ते चरण अनंताचे HECH TE CHARAN ANANTACHE

हेच ते, हेच ते, हेच ते
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे, संतमहंतांचे

सोनसळ्यांचा हा पीतांबर
वसन मनोहर पीत कटिवर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे

सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैजयंति वर सदैव रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहस्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे

हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजुन
हा श्री विष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारुन मम मनोवांच्छितांचे

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -स्वयंवर झाले सीतेचे SWAYANVAR ZALE SEETE CHE

तुझीमाझी प्रीत एकदा TUJHIMAJHI PRIT EKADA

तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌


भर नवतीची आस, नांदायची घरास, प्रेमाचं पाणी चढंल्‌ चढंल्‌ चढंल्‌

या गोष्टी अवघड झाल्यावर चौघडा, नावाचा चौघडा झडंल्‌ झडंल्‌ झडंल्‌
तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌

होनाजी कथन विरह पतन प्रीतिचं रतनं जडंल्‌ जडंल्‌ जडंल्‌
तुझीमाझी प्रीत, एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌



Music- वसंत देसाई VASANT DESAI
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie- अमर भूपाळी AMAR BHUPALI

आई म्हणोनी कोणी आईस AAI MHANONI KONI AAIS

'आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? आई घरी न दारी

चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई

येशील तू घराला परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता जरी बोलशील रागे
'आई' कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

Lyrics -यशवंत YASHAVANT
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -श्यामची आई SHYAMACHI AAI 

अशी बायको हवी Ashi Bayko Havi

अशी बायको हवी

अशी, अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी !

पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन्‌ लाघवी
अशी, अशी बायको हवी !

नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी, सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी
अशी, अशी बायको हवी !

Lyrics - Pralhad Keshav Atre प्रल्हाद केशव अत्रे
Music - Vasant Desai वसंत देसाई
Singer - Pandit Udayraj Godbole पं. उदयराज गोडबोले
Natak - अशी बायको हवी !

हसले आधी कुणी,Hasale Aadhi Kuni

हसले आधी कुणी ? तू का मी ?

सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले आधी कुणी ? तू का मी ?

अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजली परि मी निघूनी जाता
मागे वळूनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी ? तू का मी ?

नाही भेटले बळेच तुजला
कळले सखये जेव्हा मजला
परस्परावरी रुसता फुगता
जवळ येऊनी दूरची सरता
हसले आधी कुणी ? तू का मी ?

हटातटाने पटा रंगवुनि,Hata-Tatane Pata

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥

वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥

काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेशी दुधा ॥

भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा ।
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा ।
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।
तथापि न होय हरीची कृपा ।
दर्भ मुष्टिच्या गर्भि धरुनि निर्भर पशुची वपा ।
जाळिशी तिळा तांदुळा तुपा ॥

दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा ।
न सार्थक लटक्या सार्‍या गपा ॥
ही बारबार तलवार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा ।
सदा हरि कविरायावर फिदा ॥

स्नान करिती लोचने,Snan Kariti Lochane

स्नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हा पुन्हा
शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
नील कमल पाहता तूच भाससी मना

तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

लोचनास लागले वेड रे निळे निळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सावळे
जन्मपुष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना

सुंदरा मनामध्ये भरली,Sundara Manamadhye

सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

जशि कळी सोनचाफ्याची न पडु पाप्याची दृष्टी सोप्याची नसंल ती नार ।
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढुन सुकुमार ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

जशि मन्मथ रति धाकटी सिंहसमकटी उभी एकटी गळ्यामध्यें हार ।
अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदन तलवार ।
पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार ? कोण सरदार हिचा भर्तार ?
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

नाकामध्यें बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढे फार ।
किनकाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल ।
कविराज चमकतो हीर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।

सांगा मुकुंद कुणि हा,Sanga Mukund Kuni Ha

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

सुखाचें हे सुख श्रीहरी,Sukhache He Sukh Shri

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥

भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥

चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥

नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

सावन घन गरजे बजाये,Savan Ghan Garaje Bajaye

सावन घन गरजे, बजाये
मधुर मधुर 'मल्हार'

चमचम नाचे उसकी सजनी
छेल छबिली नार !
इंद्र-धनुषका मोर-मुकुट सिर
सावन घन घनश्याम चढाये

गोरी गोरी बिजली गोपी
अपना सुंदर रूप दिखाये
शहनाई बन-पवन बजाये
करे मयुर पुकार

हरियाला सावन मनभावन
बरसे अमृतधार !

सावज माझं गवसलं,Savaj Majhe Gavasala

सावज माझं गवसलं
सावज माझं गवसलं ॥

अरे अरे सावजा विसरू नको
उगाच गमजा करू नको
तीर सरासर माझा सुटता
कुणीच नाही ग बचावलं ॥

पार्वतीच्या शंकरानं
गिरिजेच्या गिरीशानं
दुर्गेच्या ग दुर्गेशानं
माझ्यावरी कृपा केली ॥

लखलख लखलख माझा बाण
करील तुझी रे दाणादाण्‌
मदन-धनूच्या बाणालाही
जयानं चटकन्‌ हरवलं ॥

अशी तशी मी नसे कुणी
मी वनराणी रूपखनी
रस राजाने नवीन यौवन
तनमन माझं सजवलं ॥

सप्त सूर झंकारित बोले,Sapt Sur Jhankarit Bole

सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा
'जय परमेश्वर, गौरीशंकर, जय गौरी-रमणा' ॥

भक्तिरसाची निर्मळ गंगा
वदे खळखळा धवल-तरंगा-
जय गंगाधर ! गिरिजा-रंगा !
जय मंगल-सदना ॥

शंकर-डमरू डम बोले-
शिव-रंजनि ! गिरिबाले !
चरणी तव नत झाले;
सुरवर करिति तव भजना ॥

सदैव सैनिका पुढेच,Sadaiv Sainika Pudhech

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

वसंत वा शरद, तुला न ती क्षिती
नभांत सूर्य वा, असो निशापती !
विशीर्ण वस्त्र हो, विदीर्ण पावले
तरी न पाय हे, कधी विसावले !
न लोचना तुवा, सुखे मिटायचे

नभात सैनिका, प्रभात येउ दे
खगांसवे जगा, सुखात गाउ दे
फुलाफुलांवरी, सुवर्ण शोभु दे
जगास शांतता, सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी, तुझे ठरायचे

शंकरा करुणाकरा,Shankara Karunakara

शंकरा करुणाकरा, पाठी उभा राहूनी ये
हाक ऐकुनी धावुनी ये धावुनी ये

फुलवुनी अंगार डोळा तूच मदना जाळिले
आपुल्या भक्तास भोळ्या तूच ना सांभाळिले
आज वणवा पेटला, मेघ तू होऊनी ये

आज लाखो वीर जाती देशसेवा कारणा
तू तुझे सामर्थ्य देई हीच माझी प्रार्थना
साधुसंतांची दयाळ, साक्ष ती घेऊनि ये

शिव-शक्तिचा अटीतटीचा,Shiv-Shakticha AtiTaticha

शिव-शक्तिचा, अटीतटीचा खेळ चालला भुवन-पटी
त्रिगुणाचे ते तीनच पाते चराचरातुनी निनादती

कधी उलटे कधी सुलटे पडती
कधी रडविती कधी हासविती
नरनरदाना कधी फिरविती
कधी मारिती, उद्धरती

पहा पहा हो पडले बारा
छे छे हे तर पडले अकरा
कधी वाकडे तेरा पडुनी
तीनतेरा वाजविती

असंख्य नरदा उगाच भ्रमती
अज्ञानाच्या घरात रमती
परी भक्तीचा पंथ सेविता
अंती मोक्ष पदावरती

चंद्र-चंद्रिका अभिन्न सुंदर
तसे निरंतर गौरी-शंकर
जेथे गौरी तेथे शंकर
एकरूप ते या जगती

शपथ या बोटांची,Shapath Ya Botanchi

शपथ या बोटांची, शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार

शपथ वनाची रे, शपथ मनाची रे
आकाशाची, दिशांगनाची
शपथ धरतीची, शपथ नवतीची
तुझी मी जोडीदार

शपथ खगांची रे, शपथ नगांची रे
प्रीत भारल्या उभ्या जगाची
शपथ या वाऱ्यांची, नभातील ताऱ्यांची
तुझी मी जोडीदार

शपथ जळाची रे, शपथ कुळाची रे
तरु-लतिकांची, फुलाफुलांची
शपथ या श्वासांची, सुगंधीत वासांची
तुझी मी जोडीदार

शपथ आजची रे, शपथ उद्याची रे
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची, शपथ रे नीतीची
तुझी मी जोडीदार

विश्वनाट्य सूत्रधार,Vishwa Natya Sutradhar

विश्वनाट्य सूत्रधार तूच शामसुंदरा ।
चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा ॥

सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमीरी ।
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा ॥

मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास ।
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा ॥

कुंचला न तव करांत, तरिही तूच रंगनाथ ।
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा ॥