Showing posts with label धाकटी सून (१९८६). Show all posts
Showing posts with label धाकटी सून (१९८६). Show all posts

सांग तू माझाच ना,Sang Tu Majhach Na

सांग तू माझाच ना ?
राहू कशी तुझियाविना

चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले, गुंतले
भासते उतरून खाली स्वर्ग ये जणु पाहुणा

भेट होता एक; झाले मी नवी, जगही नवे
वाटते; आले जुळूनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा, स्वप्न लाभे लोचना

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्नातही, मनमोहना !

मंदिरात अंतरात तोच,Mandirat Antarat Toch


मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे

तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे

संताचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे

तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे