मोहुनिया तुजसंगे नयन,Mohuniya Tujsange Nayan

मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार

ओठावरले हासे
फेकियले रे फासे
खेळाचा होय निकर हो जिवलग जादुगार

सहज पडे तुजसि दान
लागले पणास प्राण
मीपणात मन हरले, येइ रे गळ्यात हार

सारिलेस मोहरे
सहज अडविलेस चिरे
बंद जाहली घरे खेळ संपणार पार

पळभर जरि जुग जुळले
कटिवरुनी वरि सरले
एकुलती एक नरद पोटघरी होय ठार

पटावरुन लाजरे
पळे घरात मोहरे
बाजू बिनतोड मला देई चतुर हा खिलार



No comments:

Post a Comment