Showing posts with label S-पं. वसंतराव देशपांडे. Show all posts
Showing posts with label S-पं. वसंतराव देशपांडे. Show all posts

सुरत पियाकी न्‌ छिन्‌,Surat Piyaki Na Chin

सुरत पियाकी न्‌ छिन्‌ बिसुराये
हर हरदम उनकी याँद आये

नैंनन और न को समाये
तरपत हूँ बिलखत रैन निभायें
अखियाँ निर असुवन झर लाये

साजन बिन मोहे कछुना सुहावे
बिगरी को मेरे कौना बनावे
हसनरंग असु जी बहलावे

सावधान होई वेड्या,Savadhan Hoi Vedya

साधु संत सांगून गेले, त्याचा बोध घेई
सावधान होई वेड्या, सावधान होई

सोने आणि रुपे, अम्हा मृत्तीकेसमान
तुकाराम बोले, त्याची मनी ठेव जाण
सुखाची ही पायवाट, काट्यांतून जाई

मना सज्जनांच्या संगे, धरी भक्तिपंथ
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
आभाळाच्या डोळा सारे, खेळ तुझा पाही

रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
पापामधी झालं नाही, कुणी वाटेकरी
वाल्या कोळी नारदाच्या, लीन झाला पायी

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे,Vitthala Vachuni Aanikache

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान ।
नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥

आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत ।
कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म ।
विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।
भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

वाटेवर काटे वेचीत,Vatevar Kate Vechit

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जीवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो

लाविली थंड उटी,Lavili Thand Uti

लाविली थंड उटी वाळ्याची सखिच्या कुचकलशां ती ॥

कमलसुतंतु करी करि कंकण बंधित परि शोभे ती ॥

मदन निदाघ जनीं संचरुनी ताप समानचि देती ॥

युवतिस तपवि निदाघ जरी तो सुंदर कांति नुरे ती ॥

राहिले ओठातल्या ओठात,Rahile Othatalya Othat

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?

कापरे ते हात हाती बावरे डोळ्यांत आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमळे कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे ? म्हंटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण, ये भरोनी पात्र माझे

राम भजन कर लेना,Ram Bhajan Kar Lena

राम भजन कर लेना
एक दिन जाना, रे भाई !

दोन दिसांची ही तर दुनिया
ही पैशाची सारी किमया
धनदौलत ही केवळ माया
अंती येता हाक दूरची
जिथल्या तेथे राही
एक दिन जाना, रे भाई !

बाप कोठला ? अन्‌ कुठली आई ?
कुठले भाई ? अन्‌ कुठल्या ताई ?
अखेर अपुले कोणी नाही
तुटे पिंजरा, सुटे पाखरू
दूर भरारी घेई
एक दिन जाना, रे भाई !

पाया पडता लाथ मारिती
लाथ मारिता गुलाम होती
हीच जगाची उलटी रीती
आशा जगाची कशास भिती ?
पडू नको या मोही
एक दिन जाना, रे भाई !

या भवनातिल गीत पुराणे,Ya Bhavanateel Geet Purane

या भवनातिल गीत पुराणे
मवाळ, हळवे सूर,
जाऊ द्या, आज येथुनी दूर

भावभक्तिची भावुक गाथा
पराभूत हो नमविल माथा
नवे सूर अन्‌ नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूर



म्हातारा इतुका न अवघें,Mhatara Ituka Na Avaghe

म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान ।
लग्ना अजुनि लहान ॥

दंताजीचें ठाणें उटलें, फुटले दोन्ही कान ।
डोळे रुसले कांहि न बघती नन्ना म्हणते मान ।

तुरळक कोठें केस रुपेरी, डोईस टक्कल छान ।
भार वयाचा वाहुनि वाहुनि कंबर होय कमान ॥

काठीवांचुनि नेट न पाया परि मोठें अवसान ।
उसनी घेउनि ऐट चालतां काय दिसें तें ध्यान ॥

मृगनयना रसिक मोहिनी,Mriganayana Rasik Mohini

मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी ।
नवयौवनसंपन्न रम्य गतिविलासिनी ॥

आल्हादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥



मालिनिकणवाही हा वारा,Malini Kanvahi Ha Vara

मालिनिकणवाही हा वारा ।
कमलगंधयुत वाहे भरारा ॥
मदनतप्त माझ्या या शरिरा ।
फारचि सुखवीतो ॥

मानिली आपुली तुजसि,Manili Aapuli Tujasi

मानिली आपुली तुजसि मीं एकदां ।
दुःख शोक न कदा शिवुत तुजलागि तें ॥

वंचिलें त्वां जरि हितचि तव वांच्छितों ।
वरुनि सन्मार्ग तो धरिं सदा सुमतिते ॥

कष्ट जरि सोशितां वच न ये मोडितां ।
म्हणुनि जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥

माझ्या कोंबड्याची शान,Majhya Kombadyachi Shan

माझ्या कोंबड्याची शान
कोंबड्याची शान, माझ्या कोंबड्याची शान
छाती काढून चाले तुरतुरा, तुरा डोईवर छान

भल्या पहाटे उठतो आपण, उंच घुमवीतो तान
याचे गाणे ऐकून येते, निजल्या जगता भान

पिळली जाई तोवर राही, ताठच याची मान
घरी नांदता कुटुंब याचे, अन्नाची ना वाण
संतानावर याच्या जगते, देशाचे संतान

माझं ठरल्यालं लगीन,Majha Tharalyala Lageen

कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग

बाळपणापासून तुमचा आमचा मैतरपणा
संगतीनं सूर पारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता, वाढता, वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन्‌ आज कसं येड्यावाणी, जाणंयेणं सोडलं ग

आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचे आमचे काय काय बोलणे झालं होतं
दिला बोल, इसरला हातोहात, हातोहात
अन्‌ आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं

तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार, घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं

मज गमे ऐसा जनक तो,Maj Game Aisa Janak To

मज गमे ऐसा जनक तो । मांग साचा ॥

मुख सुरकुतलें, मस्तक पिकलें ।
शरीर रोगांनीं पोखरिलें ।
स्मशान ज्याने सन्निध केलें ।
त्या प्रेताला दुहिता विकतो ॥

क्रूराधम हा जनक कशाचा ।
अप्रत्यभक्षी व्याघ्र मुखाचा ।
वास नसावा जगीं अशाचा ।
नवल हेंच यम यास विसरतो ॥

बगळ्यांची माळ फुले,Bagalyanchi Maal Phule ajuni ambarat

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली !
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात ?

हातांसह सोन्याची सांज गुंफताना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना,
कमलापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात.

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?



पावना वामना या मना,Pavana Vamana Ya Mana

पावना वामना या मना ।
दे तव भजनीं निरंतर वासना ॥

श्रीवत्सांकित कौस्तुभधारिन्‌ ।
योगीजनांतररंजना ॥

भो प्रल्हादपरा हरिरूपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥


नवतुलसीदलमालाभूषी ।
बलवद्भवभयभंजना ॥

धीर धरि धीर धरी जागृत,Dheer Dhari Dheer Dhari

धीर धरि धीर धरी जागृत गिरीधारी
तारितसे भाविकांस तोच चक्रधारी ॥

अढळ पदी अंबरात बसविले धृवाला
संकटात पीतांबर दिला द्रौपदीला
दिधली वैकुंठपेठ सकल गोकुळाला
ऐसा दाता थोर कुंजवन-विहारी ॥


होसी का भयकंपित धरसि का शंका ?
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका
'जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी' ॥

दाटून कंठ येतो,Datun Kanth Yeto

दाटून कंठ येतो ओठांत येइ गाणे
जा आपुल्या घरी तू जा, लाडके, सुखाने !

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी या गोड आठवाने !

बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

घेऊ कसा निरोप ? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे !
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

तेजोनिधी लोहगोल,Tejonidhi Loh Gol

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज
हे दिनमणी व्योमराज

ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज