स्वप्नावरी स्वप्न पडे,Swapnavari Swapna Pade

स्वप्नावरी स्वप्न पडे, नीज ना मना
जागेपणी आठविते सारखी तुला !

प्रीतीचे घोष तुझ्या कानि ऐकते
मूर्तीचे चित्र तुझ्या पदरि झाकिते
अंतरिचा भाव कधी तुज न उमगला !

भोळी मी पोर तुला दुरून पुजिते
सांगावे गूज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला !

हळूच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शपथ तुला घालते
भिल्लीणिची भक्ती त्या राम समजला !

No comments:

Post a Comment