Showing posts with label
M-गंधर्व नाटक मंडळी
.
Show all posts
Showing posts with label
M-गंधर्व नाटक मंडळी
.
Show all posts
स्वस्थ कसा तूं,Svastha Kasa Tu
स्वस्थ कसा तूं ? ऊठ गड्या ।
झणि टाक उड्या ॥
नकळे का वर्षे ।
घन सुधेचा, छ्बड्या ? ॥
सरले अजि सारे ।
कुदिन अपुले, बगड्या ! ॥
सुरसुखखनि तू विमला,SurSukhKhani Tu Vimala
सुरसुखखनि तू विमला । सगुणा कविबाला ।
वदनमणि मज रमणी । अचुक दावी मार्गाला ॥
देवयानि देह धरे । अमर विभवगुण सारे ।
सकलकला कवितनुजा । चरण मला बाला ॥
सुखचि सदा कधि मिळत,Sukhachi Sada Kadhi Milat
सुखचि सदा कधि मिळत न कवणा ।
मिश्ररूप जग ।
सुखचि रिघे अघ ।
दु:खातुनि हो जन्म सुखांना ॥
हो जरि आशा मात्र सुखवशा ।
करित विधि तरी अंति निराशा ।
रमत मतिहि नच प्राप्त सुखिहि मग ।
करि अवमाना ॥
सरिता जनिं या प्रबला,Sarita Jani Ya Prabala
सरिता जनिं या प्रबला भारी ।
जरि दिसती शीर्ण नयनांतें अविकारी ॥
उत्तान गमति दर्शनीं जरी ।
गंभीर अति तरी ।
भवजलधीहुनि दुस्तर संसारी ॥
सद्गुणां वधोनि हा,Sadguna Vadhoni Ha
सद्गुणां वधोनि हा !
दंभ विजय मिरवी महा ॥
मोहपाशभेद ना ।
ज्यांसि अल्पही शक्ति ना ।
विरतीसि भोगी स्तविती ।
तेचि; काय विस्मय न हा ॥
सत्य वदे वचनाला,Satya Vade Vachanala
सत्य वदे वचनाला । नाथा ।
स्मरुनि पदाला या सुरविमला ॥
वित्त पराजित मानी विषसम ।
स्पर्शिन ना कधि मी त्याला ॥
सकल चरचरि या,Sakal Charachari Ya
सकल चरचरि या तुझा असे निवास
पाषाणाच्या वससि जरी मूर्तिमधे
उत्पलहृदयि वससि खास
वेध तुझा लागे,Vedh Tujha Lage
वेध तुझा लागे सतत मनी । वसतिच केली नामे वदनी ॥
जगत सकल सखि भासत त्वन्मय । मधुर रूप तव खेळे नयनी ॥
विमल अधर निकटि,Vimal Adhar Nikati
विमल अधर निकटि मोह हा पापी । वदन-सुमन-गंध लोपी ॥
धवला ज्योत्स्ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर ॥
वसुधातलरमणीयसुधाकर,Vasudha-Tal-Ramaniya
वसुधातलरमणीयसुधाकर ।
व्यसनघनतिमिरि बुडविसी कैसा ? ॥
सृजनि जया परमेश सुखावे ।
नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा ॥
लोळत कच मुखमधुवरि,Lolat Kach Mukhamadhuvari
लोळत कच मुखमधुवरि, त्यासि तोचि कर निवारी ।
भ्रमरयोग कमलभोग, या धर्मा दूर न करि ॥
शिक्षेला कच न पात्र; देवयानि, तूचि शपथ सफल काम ।
नलिनिनाथ दुखवि न वनि कच यापरि ॥
लागे हृदयी हुरहुर,Lage Hridayi Hurhur
लागे हृदयी हुरहुर । अजि ।
सुखविषय गमति नच मज सुखकर ॥
काही सुचेना । काही रुचेना ।
राहि कुठे स्थिर मति नच पळभर ॥
ललनामना नच, Lalana Mana Nach
ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ।
सृजनि त्यांच्या विधि तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम ॥
लग्न होईना नाथा, Lagna Hoina Natha
लग्न होईना, नाथा; तात साहिना ॥
सुरवर, माना सहोदर या जना,
त्यागचि तारक कांता, विरही मनांना ॥
मानस का बधिरावे हे,Manas Ka Badhirave He
मानस का बधिरावे हे ? ।
बघतसे खिन्न जगता ॥
गृहशृंखला या । दृढ बद्ध पाया ।
बल ना भेद तया होता ॥
मधुमधुरा तव गिरा,MadhuMadhura Tav Gira
मधुमधुरा तव गिरा मोहना, भासे निशेची भूल मना ॥
मदिरा म्हणू तरी ती भ्रांती, मधु रिपु हाच खर ही ख्याती;
दीनवशे परी मनधरणी ही करवि हे नवल होई जना ॥
मधुकर वनवन फिरत,Madhukar Vanvan Phirat
मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला
भोगी पुष्पमाला, अभिनव कुसुम मधुपा
सहज सुखविती, नूतन शृंगाराला ।
भ्रमर सुरस वनि दिसला
कमला टाकुनि कच अदय भयद झाला
कोमेजले सुमनदल, दुखवि मजला ॥
मद्यवपु घट लत्ता,Madyavapu Ghat Latta
मद्यवपु घट लत्ता प्रहारे फुटत हे,
रुधिर सम मत्तमद वाहे न भूभार साहे ॥
मधु वध कुपित समर जरि गुरुवर करी घोर,
विगत विजय कच नोहे ॥
मद्यमद चोरि तप,Madyamad Chori Tap
मद्यमद चोरि तप दाऊनि सुख नरा ।
चौर्यकरी; बल भास; शापयोग्या सुरा ॥
ही वारयोषिता दारुणा सेविता ।
भस्म करिते जना, व्याधी भयंकरा ॥
मज जन्म देइ माता,Maj Janma Dei Mata
मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्ही ।
निजकन्यका गणोनी । न कांही केले कमी ॥
उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेऊनी ते । फेडीन काय मी ॥
सदया मनासि ठेवा । आपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदें नमी ॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)