Showing posts with label बाळ माझं नवसाचं (१९५५). Show all posts
Showing posts with label बाळ माझं नवसाचं (१९५५). Show all posts

स्वप्न उद्याचे आज,Swapna Udyache Aaj

स्वप्न उद्याचे आज पडते, चित्र चिमणे गोजिरवाणे
नयना पुढती दुडदुडते !

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे, शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते !

चितोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाळ होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते !

ऊठ म्हणता उठते क्रांती, ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती लाडे लाडे आई म्हणता
भारत-दर्शन मज घडते !