Showing posts with label S-आशालता वाबगावकर. Show all posts
Showing posts with label S-आशालता वाबगावकर. Show all posts

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या,Swapna Nagarchya Sundar

>स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
जागहि नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

तव भास अंतरा झाला,Tav Bhas Antara Jhala

तव भास अंतरा झाला मन रमता मोहना

हासती फुले भवताली
मधुर ये फळावर लाली
स्मितसाम्य तुझ्या अधरीचे मम खिळवी लोचना

वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव हृदयपुष्पगंधाची अनुभविते कल्पना

जन्म दिला मज ज्यांनी,Janma Dila Maj Jyani

जन्म दिला मज ज्यांनी, घडिले हे मन ही काया,
आटली का त्यांची माया ?

जये सारिका एक चिमुकली जपली तळहाती
तेच का पंख तिचे खुडती ?

मज आस न दुसरी लाभावा ऋषिवर,
आश्रमी रमावे संसारी सुंदर !
मग स्वर्गहि भुलुनि येईल या भूवर !

पुण्याईने ज्यांच्या लाभे दैवत या हृदया
निमाली त्यांची का छाया ?

गर्द सभोंती रानसाजणी,Garda Sabhoti Ran Sajani

गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधीसी या यमुनेच्या जळी ?

ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर.
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा"

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला
तू वनराणी दिसे न भुवनी तुझिया रूपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी ?
तव नयनी या प्रेमदेवता धार विखारी भरी

अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी ये चल माझ्या घरी"

अर्थशून्य भासे मज हा,Artha Shunya Bhase Maj Ha

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा; खेळ कल्पनेचा

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा