स्वर उमटावे शुभंकरोती,Swar Umatave

माझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती
सुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोती

रात्री थकुनी निजण्यापूर्वी, ओठी यावा अभंग, ओवी
भूपाळीने आळवीत मी जागे व्हावे पुन्हा प्रभाती
स्वर उमटावे शुभंकरोती

दिवस सरावा करिता सेवा, कंटाळा मज मुळी न यावा
नव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी जुनी संस्कृती
स्वर उमटावे शुभंकरोती

मी रांधावे, मी वाढावे, तुटू न देता हळू जोडावे
कुणावरून तरी ओवाळावे जीवन व्हावे एक आरती
स्वर उमटावे शुभंकरोती

No comments:

Post a Comment