Showing posts with label M-प्रभाकर पंडित. Show all posts
Showing posts with label M-प्रभाकर पंडित. Show all posts

बोलने नको आता BOLANE NAKO AATA

बोलने नको आता, असेच मूक राहू या
सांज रंगी रंगलेले,क्षितिज मात्र पाहु या

अबोध कहींसे असे ,मनात जे न वाटले
फुलफुलांत येथल्या सुवास तेच दाटले
धुंद गंध तो जरा उरी भरून घेऊ या

गूज अंतराताले तरल फुलपाखरू 
श्वास ज्या ना सहावे स्पर्श त्या कसा करू
चित्र रम्य हलते नित्य नयनी ठेऊ या

मिळून दूर जाहल्या क्षणैक दोन सावल्या 
गहन त्या तमी कुणी लक्ष ज्योति लावल्या
तो प्रकाश आगळा जन्म जन्म लेवू या

Lyrics -शांता शेळके SHAATA SHELAKE
Music -प्रभाकर पंडित PRABHAKAR PANDIT
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU








हा सूर चांदण्यांचा HA SUR CHANDNYANCHA

हा सूर चांदण्यांचा,एकांत गीत गाई
माझ्या मनात एका,स्वप्नास जग येई

हे गोड गीत कैसे,वेढी अनु अनुला
आश्लेष वल्लरीचा,वृक्षचिया तनुला
वारा सुंगधपने,नि:श्वास  धुंद वाही
माझ्या मनात  एका,स्वप्नास जग येई

वर गर्द पान जाळी,निद्रिस्त मूक पक्षी
घ्यावा प्रकाश खाली,गुंफी सुरेख नक्षी
चाहूल ये कशाची,आभास काय होई
माझ्या मनात  एका,स्वप्नास जग येई

अर्धेच गीत ओठी,अर्धाच सुर आहे 
श्वसातल्या लयीने,हे सुर कापताहे
अर्ध्याच पापण्यानी ,मी आसमंत पाही
माझ्या मनात  एका,स्वप्नास जग येई

Lyrics -शांता शेळके  SHANTA SHELKE
Music -प्रभाकर पंडित PRABHAKAR PANDIT
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPU









स्वातंत्र्याची घुमे तुतारी,Swatantryachi Ghume Tutari

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणाऱ्या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती

संसारी या माझ्या अवघा,Sansari Ya Majhya Avagha

श्रीरघुनंदन तुझेच चिंतन सदैव मुखी तव नाम
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

तूच निर्मिले सुंदर हे घर, नभ मायेची त्यावर पाखर
रूप आगळे तुझे धनुर्धर, विश्वचि हे निज धाम
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

तुझिया चरणि अर्पुन तनमन, भावभक्तिचे हृदयी पूजन
मीच विसरते माझे मीपण, तुझेच अवघे भान
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

जीवनात या राम असावा, जन्मोजन्मी नित्य भजावा
तुझा लाभू दे मला विसावा हेच हवे वरदान
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

मीलनास आपुल्या साक्ष,Milanas Aapulya Saksh

मीलनास आपुल्या साक्ष धवल चंद्रकोर
अक्षदा अन्‌ मंत्र नको, नको साक्षी सनई-सूर

का असे न ऋतू वसंत, मन कोकिळ गाइ गीत
रातकिडा देई साथ छेडुनिया एक सूर

धुंद गंध दरवळला लतामंडपी सगळ्या
भूषविते अधिक त्यास पुष्पशेज नक्षिदार

येई सखे.. ये समीप, नभ उजळीती लक्ष दीप
देहलता तव कापे स्पर्शताच पवन गार

मन हा मोगरा अर्पुनी,Man Ha Mogara Arpuni

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।
पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥

मन हे शेवंती देऊ भगवंती ।
पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥

मन हे तुळशी देऊ हृषिकेशि ।
पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥

तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा ।
तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥

भाग्य पांगळे भोग,Bhagya Pnagale Bhog

भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पाप-पुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी

कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी

फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आंसवे ढाळी

दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचीत पाळी

तुम्ही संत मायबाप,Tumhi Sant Maay-Baap

तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥

अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥

वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥

तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥

काय या संतांचे,Kaay Ya Santanche

काय या संतांचे मानूं उपकार ।
मज निरंतर जागविती ॥१॥

काय द्यावें यांसी व्हावें उतराई ।
ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२॥

सहज बोलणें हित उपदेश ।
करूनि सायास शिकविती ॥३॥

तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं ।
तैसे मज येथ सांभाळित ॥४॥

काय आणितोसी वेड्या,Kaay Aanitosi Vedya

काय आणितोसी वेड्या डोळियांत पाणी
दु:ख-सौख्य सारे अंती एकरूप मानी

जन्मजात तितुका आहे जीव मात्र एक
भोग भोगताहे ज्याचा जसा कर्मलेख
सारखेच असती, नाही उच्चनीच कोणी

कुठे एक माती धरुनी भिन्न भिन्न रंग
भिन्नभिन्न दिसती डोळां जळीचे तरंग
लाटलाट विरता राही तळी एक पाणी

रजतरूप दावुनि भुलवी शिंपली उन्हात
सर्परूप दिसता रज्जू कापसी मनात
भवाकार खोटा अवघा, ब्रम्ह सत्य जाणी

आज मी तुझ्यासवे, Aaj Mi Tujhyasave

आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले

सतत तुझ्या मीलनि, गंध धुंद दरवळे



फूल हे मनातले, मिठीत ते तुझ्या हसे

या सुखात भिजताना लागले तुझे पिसे


राजसा तुझ्यामुळे भाग्य मला लाभले



राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले

दोन मने जुळताना कधी न मी पाहिले

नाही येत सांगता कोण कधी हरवले