Showing posts with label अपराध (१९६९). Show all posts
Showing posts with label अपराध (१९६९). Show all posts

स्वप्नात पाहिले जे ते रूप,Swapnat Pahile Je Te Roop

स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा, ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते, नयनांत दीप होते

मिटताच पापणी ही मिटली कळी अबोल
मौनात अर्थ होता शब्दांहुनी सुरेल
बागेतल्या फुलांचे गालास रंग होते

सांग कधी कळणार तुला,Sang Kadhi Kalanar Tula

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला

सूर तेच छेडीता,Soor Tech Chedita

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे

एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे

तुझी प्रीत आज कशी स्मरू,Tujhi Preet Aaj Kashi Smaru

तुझी प्रीत आज कशी स्मरू ?
तुझी प्रीत, प्रीत ना राहिली
तुझे गीत, गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू ?

तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधि ते संपले
उरली अता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू ?

तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हातांविना मी त्या कशि
रे तोल माझा सावरू ?

होतास तू माझा कधि
होते तुझी मी एकदा
अश्रूत भिजल्या पाकळ्या
मी ओंजळीत कशा धरू ?