Showing posts with label M-एन्‌. दत्ता. Show all posts
Showing posts with label M-एन्‌. दत्ता. Show all posts

हे चिंचेचे झाड HE CHINCHECHE ZAD


हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी

रुसलीस उगा का जवळी ये ना जरा
गा गीत बुल्बुला माझ्या चितपाखरा
हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी

हर रंग दाविती गुलाब गहिरे, फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी


Lyrics -ग. दि. माडगूळकर  G.D.MADAGULAKAR
Music -एन्‌. दत्ता N.DATTA
Singer -महेंद्र कपूर MAHENDRA KAPOOR
Movie / Natak / Album -मधुचंद्र MADHUCHANDRA

हलके हलके जोजवा,Halake Halake Jojava

हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली ग मऊ मऊ मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची गोरी गोरी काया
बाळ रुपडे देवाचे, भुलविते लोचना

खेळवा लाडानं गोपा बायांनो
गोविंद घ्या, गोपाळ घ्या, म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचा, हा राजा देखणा

कुर्रर्र करा कानात हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग
आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा

स्वप्नात पाहिले जे ते रूप,Swapnat Pahile Je Te Roop

स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा, ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते, नयनांत दीप होते

मिटताच पापणी ही मिटली कळी अबोल
मौनात अर्थ होता शब्दांहुनी सुरेल
बागेतल्या फुलांचे गालास रंग होते

सांग सखे मी चोर कसा,Sang Sakhe Mi Chor Kasa

सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा

ही चोरी, बळजोरी, या प्रीतिच्या थापा रे
समजू नको, उमजू नको, खेळ नसे हा सोपा रे
घालुनी बेड्या, नेतील वेड्या, जन्मभरी तू कैदी जसा

बेहोषी, मदहोशी, हिरव्या हिरव्या किमयेची
यौवन हे, मधुवन हे, पर्वा ना मज दुनियेची
या एकांती, वनी दिनांती, प्रणयासाठी जीव पिसा

रंगत ही, संगत ही, या कैदेची और मजा
हात धरू, साथ करू, दोघे भोगू एक सजा
या भेटीचा, दिठीमिठीचा, हृदयांवरती गोड ठसा

सांग कधी कळणार तुला,Sang Kadhi Kalanar Tula

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला

संसार मांडते मी,Sansar Mandate Mi

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी, संसार मांडते !

दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला मी जवळ ओढते !

नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते !

हातात आज माझ्या सौभाग्यदान आले
ठेवू कशी कुठे ग मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते !

सूर तेच छेडीता,Soor Tech Chedita

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे

एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे

सुरावटीवर तुझ्या उमटती,Suravativar Tujhya Umatati

सुरावटीवर तुझ्या उमटती, अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी, तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

काल रात्री मी जाग जागलो, अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा, तुला समजले, मला समजले

तीन दिवस ना भेट आपुली, कितीदा माझे डोळे भिजले
आसूमागिल भाव अनामिक, तुला समजले, मला समजले

तुझ्या नि माझ्या मनात राणी, गूज खोलवर एकच रुजले
कुजबूज काही केल्याविन ते, तुला समजले, मला समजले

मनोरथांचा उंच मनोरा, मजल्यावरती चढले मजले
मधुचंद्रास्तव लाभे वास्तू, तुला समजले, मला समजले

मला आणखी तुला आपुले, दोघांचेही भाव उमजले

माणुसकीचे पाईक आम्ही,Manusakiche Paik Aamhi

एक दोन तीन !
माणुसकीचे पाईक आम्ही असे वारसा हा प्राचीन !

सज्जन त्यांचे आम्ही साथी, ब्रीद सांगते निधडी छाती
त्यांच्यासाठी धावुन जाऊ मरणहि माथा झेलून घेऊ
भला तयाला धरू उराशी उच्च असो वा अनाथ दीन !
एक दोन तीन !

माणुसकीचे केवळ लांछन दुर्जन तो तो अमुचा दुष्मन
निर्भयतेने गर्जत ’हर हर’ संगर त्याशी करू भयंकर
दुष्ट तयाचे दमन करावे मार्ग नसे हा अम्हां नवीन !
एक दोन तीन !

एक जाणतो आम्ही प्रीती: तोच वेद, ती गाथा, पोथी;
मंगल पावन प्रीतीसाठी विष हो अमृत अमुच्या ओठी
या प्रीतीच्या चरणांवरती विश्व होतसे अवघे लीन !
एक दोन तीन !

मधु इथे अन्‌ चंद्र,Madhu Ithe An Chandra

मधु इथे अन्‌ चंद्र तिथे, झुरतो अंधारात
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात
संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर, वाऱ्यावरची वरात
वाऱ्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात



पाखरा गीत नको गाऊ,Pakhara Geet Nako Gau

पाखरा, गीत नको गाऊ !
कातरवेळी आतुर जीवा, वेध नको लावू;
पाखरा, गीत नको गाऊ !

शब्दांहुन तव सूर बोलके
कानी येता काळिज चरके
विरहाचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू ?
पाखरा, गीत नको गाऊ !

रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा ?
त्या प्रीतीच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ
पाखरा, गीत नको गाऊ !

निंबोणीच्या झाडामागे,Nimbonichya Jhadamage

निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर, झोपल्या ग जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी, उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले, माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता, गाऊ कशी मी अंगाई



निळे गगन निळी धरा,Nile Gagan Nili Dhara

निळे गगन निळी धरा निळे निळे पाणी
ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी

माती ही मायमाऊली

गंधाने चिंब नाहली
वारसा तिचा, खरा दास मी तिचा
नाती ही आमुची पुराणी

हिरवळ ही मुक्या मनाची
पांघरते शाल उन्हाची
झाड डोलते, हळू पान बोलते
फांदीवरी कुहूकुहू गाणी

हुंदडती गायवासरे
बागडती चिमण पाखरे
मुलाफुलांची, अशी चिलापिलांची
दुनिया ही भाबडी अडाणी

आनंदी जिणे जगावे
अंतर उजळून निघावे
प्रेम लुटावे, असे गात सुटावे
सोडवीत सुखाची उखाणी



नाही येथे कुणी कुणाचा,Nahi Yethe Kuni Kunacha

नाही येथे कुणी कुणाचा
स्वार्थ हा एकच न्याय जगाचा !

कुणी न इथला नित रहिवासी
जो जो आला जाणे त्यासी
स्वार्थ सुटेना परी तयासी
स्वार्थास्तव कुणि इमान विकती
कोणी विकती वाचा !

बळी कुणी स्वार्थाचे होती
जिवंत तेही मरण भोगती
भुतासारखे जगि वागती
शाप बाधतो परी तयांना
तळमळत्या आत्म्यांचा !

सावध, सावध सोडव विळखा
दूर सारुनी फसवा बुरखा
पारखून घे अपुला परका
मायावी मयसभा असे ही
रंगमंच कपटाचा !

धुंदीत गाऊ मस्तीत राहू,Dhundit Gau Mastit Rahu

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा

थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हांत, धुके दाटलेले
दुधी चांदणे हे, जणु गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दंवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची, फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी,
अशी मीलनाची आहे रीत साजणी

अशी हिरवळीची शाल पांघरावी
लाली फळांची गाली चढावी
हळूहळू वारा, झंकारि तारा
आळवित प्रीतीचे संगीत साजणा


जळी यौवनाच्या, डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्य काली, नशा आज आली

एकांत झाला, जणू आज पाहुणा



धुंद ही हवा तरी फूल,Dhund Hi Hava Tari Phool

राग म्हणू की अनुराग कळेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

रूप लाडकी एक वल्लरी
अंग चोरिते लाज बावरी
लहर खेळवी, तरी पान हलेना

धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जीव भाबडा जाण नसावी
मुक्या मनी का प्रीत हसावी
भेटलो तरी सहवास मिळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

मिठी दिठीचा फुले फुलोरा
स्पर्शसुखाचा उठे शहारा
आज वाटते का दिवस ढळेना

धुंद ही हवा तरी फूल फुलेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना


Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -एन. दत्ता N.DATTA
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album - मामा भाचे MAMA BHACHE

देवतुल्य बाबा माझे,Devatulya Baba Majhe

देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
पुजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही

पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योती
लावुनिया पावन होतो चरणधूळ माथी
सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई

शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम
वचन सत्य बोलायाचा असे नित्य नेम
भल्याबुऱ्या परिणामांचा खेदखंत नाही


नभाहून मोठी माया, हृदय सागराचे
समाधान खेळे सदनी शांति-वैभवाचे
प्रपंचात राहूनीया सत्वशील राही

तुझ्या पंखावरूनि या,Tujhya Pankhavaruni Ya

तुझ्या पंखावरूनि या मला तू दूर नेशिल का ?
तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का ?

गंध नवा, धुंद करी , हवेत हा गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजिवा
प्रीतीच्या स्वप्नी सदा, असाच येशील का ?


आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना !
नित्य असा सांग सदा माझाच होशिल का ?

तुझी माझी प्रीत जमली,Tujhi Majhi Preet Jamali

तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी

पिरतीचा ग तरू वाढं हळू हळू

तहानभूक हरू जीवलगासाठी
चाफ्याचा ग वास अन्‌ पिरतीचा ग ध्यास
लपंल्‌ कसा जरी केली आटाकाटी


इवली इवली छोटी अंगण पुढं-पाठी
बिघाभर रान माझं वढ्याकाठी
तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी

सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी

पिकला हरभरा, गहू तरारला
चिमणा चांद आला माझ्या पोटी
नगं शेहरगाव नगं नाणं-सोनं
देवाघरचं लेणं आम्हासाठी

तुझी प्रीत आज कशी स्मरू,Tujhi Preet Aaj Kashi Smaru

तुझी प्रीत आज कशी स्मरू ?
तुझी प्रीत, प्रीत ना राहिली
तुझे गीत, गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू ?

तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधि ते संपले
उरली अता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू ?

तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हातांविना मी त्या कशि
रे तोल माझा सावरू ?

होतास तू माझा कधि
होते तुझी मी एकदा
अश्रूत भिजल्या पाकळ्या
मी ओंजळीत कशा धरू ?