चांदणे शिंपीत जाशी,Chadane Shimpit Jashi

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले

वाहती आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुंजाची झळाळी तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी ?
पाहु दे मेघाविण सौंदर्य तूझे मोकळे

No comments:

Post a Comment