Showing posts with label M-छोटा गंधर्व. Show all posts
Showing posts with label M-छोटा गंधर्व. Show all posts

सूख संचारक पवन,Sukh Sancharak Pavan

सूख संचारक पवन असे मी
समता सांभाळी

कळी-कळी ते मीच फुलवितो
भेद न मज जवळी

वेली-वेली डोलडोलवी
माझ्या हिंदोळी

सुगंध घ्यावा, सुगंध द्यावा
हाचि धर्म पाळी

सुखवीत या संसारा,Sukhavit Ya Sansara

सुखवीत या संसारा, जगती मेळ जिवाचा प्यारा ।
हृदय ना जरी मिळतां हृदया, जात खचित प्रीति विलया ॥

रागिणी-मुखचंद्रमा,Ragini Mukhachandrama

रागिणी-मुखचंद्रमा ।
उजळि हृदयी पूर्णिमा ॥

कोपता खुलतो कसा ।
वदन-शशिचा लालिमा ॥

रूप बघुनी लज्जिता ।
होति पूर्वा-पश्चिमा ॥



रतिहुन सुंदर मदन-मंजिरी,Ratihun Sundar Madan

रतिहुन सुंदर मदन-मंजिरी !
मदनाचे वरदान तुला ॥

ललित कोमल तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलांचा, नाद कशाला हवा तुला ?

येतिल कधि यदुवीर,Yetil Kadhi Yaduveer

येतिल कधि यदुवीर-सखये ।
मानस होत अधीर ॥

कटु वदले मी, रुसवा केला
म्हणुनि जिवाचा जिवलग गेला
सोडूनि हे मंदिर ॥

विरहाचा वैशाख तापला
शांत सुशीतल चंद्र लोपला
कोठे धीर समीर ? ॥



नारायण नारायण नाम,Narayan Narayan Naam

नारायण ! नारायण ! नाम तुझे अति पावन ॥
कमलापती कमल नयन भयहारण-भवतारण ॥
तू धरणी, तूच गगन, तूच आप तेज पवन ॥
तू स्थिति-लय, रजनी-दिन, तूच कार्य तू कारण ॥

दिलरुबा मधुर हा दिलाचा,Dilaruba Madhur Ha Dilacha

दिलरुबा मधुर हा दिलाचा ।
छेडित राग गोड प्रीतिचा ॥

करित साथ संसार-संगीता ।
नाद सुखद तव हृदयाचा ॥

ती पाहताच बाला,Ti Pahatach Bala

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला, की आरपार गेला

स्वर्गातल्या पऱ्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधिने, रचिला तिचा छबेला

लावण्य काय सारे, उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला

डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती, तिज अन्‌ पहावयाला

चांद माझा हा हासरा,Chand Majha Ha Hasara

चांद माझा हा हासरा ।
नाचवी कसा प्रेमसागरा ।
प्रीत लहरी ये भरा ॥

गुण कनकाच्या नव कोंदणी गे ।
शोभसी सखे, तू हिरा ॥

फुलला मनीं वसंत बहार Phulala Mani Vasant Bahar

फुलला मनीं वसंत बहार ।

मुनिवर्याच्या कृपाप्रसादे नुरला चिंताभार ॥



उदासवाणा शिशिर संपला

वासंतिक मधुगंध पसरला

धुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम झंकार ॥

अंगणी पारिजात फुलला,Anagani Parijat Phulala

अंगणी पारिजात फुलला ।
बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला
गमले मजला मुकुंद हसला
सहवासातुन मदिय मनाचा कणकण मोहरला !