चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा
फुले प्रकाशांची माझ्या दारी अंथरा
हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत
मूर्त माऊलीची माझ्या न्याहळा जरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !
पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी
डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !
टांगलेली छायाचित्र देवासारखे पवित्र
स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !
पलिकडे खाटेवरी भर मध्यान्हीच्या पारी
दिव्यातली भाऊराया वाती औक्षरा
जा जा जा रे माझ्या माहेरा !
No comments:
Post a Comment