Showing posts with label जशास तसे (१९५१). Show all posts
Showing posts with label जशास तसे (१९५१). Show all posts

हरि तुझी कळलि चतुराई,Hari Tujhi Kalali Chaturai

हरि, तुझी कळलि चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही !

गायी मागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरनि या मला अडवुनी
दाविसी धिटाई !

गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडी काढिता हो‍उ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि
काय रे तऱ्हा ही !

मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना
हिरवी वनराई !

रानी लिंबास आला बहार,Rani Limbas Aala Bahar

हिरव्या साडीस पिवळी किनार ग
रानी लिंबास आला बहार ग

बाळवयातल्या गौळणी
यमुनेच्या जणु अंगणी
बाळकृष्णाशी करिती विहार ग

वाळवंटी घुमे पावरी
रानवारा तसा सूर धरी
डुलल्या गौळणी हलले शिवार ग

नाच झाला ग झाला सुरु
किती आनंद डोळां भरू
बळी राजाचं देणं उधार ग

मोठं मोठं डोळं तुझं,Motha Motha Dola Tujha

मोठं मोठं डोळं तुझं, कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय्‌ रं !

नको दावू धाक मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतिल, मी भुलायची नाय्‌ रं !

लाडीगोडी सोड, भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय्‌ रं !

असशिल मोठा नाग, तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय्‌ रं !

शिकारीची हाव तुला, हरिणीमागे धाव
रानातली साळू तुला मिळायची नाय्‌ रं !

पुरे तुझी ऐट, माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय्‌ रं !

पक पक ,Pak Pak Pakak

पक पक पक पक पकाक पक
आज काही नाही कामात उरक

काल तुला पाहिली, आस मनी राहिली

तुझी नि माझी व्हावी वळख

लाखाहुनी न्यारा, तुझा गडे तोरा
डोळ्यात काही न्यारी चमक

वय तुझं चौदा, लहान पोरसवदा
चालण्यात बोलण्यात न्यारी लचक

गोरा तुझा रंग, लुसलुशीत अंग
ओठांची ठेवण तांबडी भडक

तुझ्या गालावर तीळ, माझ्या ओठात शीळ
तुझं तूच हे गुपित वळख



चिंचा आल्यात पाडाला,Chincha Aalyat Padala

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला !

माझ्या कवांच आलंय्‌ ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय्‌ पाणी
काय बघतोस राहुन आडाला ?

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वर खाली
फळ आंबुस येइल गोडाला !

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला ?