चांदणं टिपूर हलतो वारा,Chandane Tipur Halato Vara

चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा, की मागल्या दारा
त्यावर बसा की,हवालदारा, की शिलेदारा !

डावी पापणी फुरफुर करी
नवसाला अंबाबाई पावली खरी
अवचित, सजणा, आला घरी

मनिच्या खुशीत, की मजला कुशीत घ्या, दिलदारा !

पंचकल्याणी घोड्यावरून
दौडत आलो, सये, दुरुन

रूप घेऊ दे डोळा भरून
तुजला बघून ग, जाइल निघून हा थकवा सारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

शालूच्या पदरानं पुसते हा पाय
खायाला देते मी साखरसाय
आणखीन सेवा करू मी काय ?

पडते गळा, की लावते लळा, की द्या आधारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

नेसुन चांदणं आलीस अशी
पुनव देखणी झुकलिस जशी
डाव्या हाताची घे ग उशी
चांदणं मिठित, कि चांदणं दिठित, झिमझिम धारा !
चांदणं टिपूर, हलतो वारा, की डुलतो वारा !

No comments:

Post a Comment