चांदण्यात ह्या धरणी,Chandanyat Hya Dharani

चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी
चांदणे फुलले माझ्या मनी

आभाळाची धरणीवरती
अशीच आहे अखंड प्रीति
त्या प्रीतिच्या शीतलतेने, सुखावली रजनी

ओली वाळू झाली रूपेरी
नाचनाचती सागर लहरी

माडांमधुनी लबाड वारा, आळवितो गाणी

या चंद्राच्या अनंत लीला
उपमा नाही अवखळतेला
अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणीNo comments:

Post a Comment