चांदणे झाले ग केशरी
पुसट न झाल्या तारा तोवर अरुण उतरला घरी
सरल्या काळ्या अबोल रात्री
नवचंद्रासम उगवे प्रीती
भाव पौर्णिमा अंती बहरे उभयांच्या अंतरी
काल वाटली तुळस लाजरी
आज तिच्यावर दिसे मंजिरी
कृष्ण कडेवर घेई जणु ही यशोमती सुंदरी
मुक्या माउली तुजसी सांगते
माझ्याही उरी गूज रांगते
सुखद वाटते गोवत्सांची म्हणुन मला चाकरी
No comments:
Post a Comment