Showing posts with label S-दीनानाथ मंगेशकर. Show all posts
Showing posts with label S-दीनानाथ मंगेशकर. Show all posts

सुकतातची जगि या,Sukatatchi Jagi Ya

सुकतातची जगि या ।
जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी ।
उमलति ना त्याहि कलिका । ज्या ॥

परंतु सुंदर कळ्या पाकळ्या ।
फुलती ही जगिं या ।
विसर ना हे वैतागीं । तुझीया ॥

साजणि बाई सजवी मजसी,Sajani Bai Sajavi Majasi

साजणि बाई । सजवी मजसि करि घाई ।
लगीन घडि जाई । वेळ आली भरा ।
देव आले घरा । करा चतुराई ॥

साजणि बाई । नटुनि थटुनि लवलाही ।
निघते अंगाई । राजराजेश्वरा ।
जवळि याहो जरा । बघिन मुख काही ॥

साजणि बाई । चपळ पळत मन पदी ।
जवळि नच राहो । मंगलाचे सडे ।
टाकि चोहीकडे । दावि नवलाई ॥

समयी सखा न ये,Samayi Sakha Na Ye

समयी सखा न ये । मी जात फसुनि गे ।
बघत वाट थकलें. । मी दारिं बसुनि आतां गे ॥

मानि ना आता गोडी गुलाबी पुन्हा ।
सख्याशीं मांडिलें मी युद्ध रुसुनि आतां गे ॥

गांठ होतांचि या । शत्रुकंठी पाश हा ।
आलिंगनाचा । फेकीन कसुनि आता गे ॥

दूति जा सांग । आलांत जा तसेची ।
प्रिया रडवीनची । मी हसुनि हसुनि आता गे ॥

सकल चरचरि या,Sakal Charachari Ya

सकल चरचरि या तुझा असे निवास

पाषाणाच्या वससि जरी मूर्तिमधे
उत्पलहृदयि वससि खास

शांत दांत कलिका ही,Shant Dant Kalika Hi

शांत दांत कलिका ही । चारुगात्री देवता ही ॥

त्रस्त जगा शांत करी । वधोनि रिपुमत्ता ही सदाही ॥

शूरा मी वंदिले,Shoora Mi Vandile

शूरा मी वंदिले ।
धारातीर्थी तप जे आचरती ।
सेनापति यश याचि बले ॥

शिरकमला समरी अर्पिती ।
जनहित पूजन वीरा सुखशांती ।
राज्य सुखी या साधुमुळे, वंदिले ॥

शत जन्म शोधिताना,Shat Janm Shodhitana

शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥

वदनीं धर्मजलाला,Vadani Dharmajalala

वदनीं धर्मजलाला । पुसुनि पुसुनि कर शिणला ।
श्वासभरित उर जाहला । ये रक्तपणा गाला ॥

रवि मी हा चंद्र कसा,Ravi Mi Ha Chandra Kasa

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥

त्या जे न साधे गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी ।
अबलाबल नव हे भासे ॥



मर्मबंधातली ठेव ही,MarmaBandhatali Thev Hi

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥



भासे जनात राया,Bhase Janat Raya

भासे जनात राया । हां असे मनात राया
नवखंड देह नटला । दिलदार प्यार राया
मागे सदा फिराया । भागे अनंत काया
लावे जिवास माया । लाभे परी न राया
हाती अखंड भरला । इष्के शराबे प्याला
नाही अजून प्याला । दिलदार प्यार राया

भाव भला भजकाचा,Bhav Bhala Bhajakacha

भाव भला भजकाचा । साधी प्रभुदया ॥

कायिक वाचिक नच याग निभावे । हृदयि रिघे देव ॥

भाली चंद्र असे धरिला,Bhali Chandra Ase Dharila

भाली चंद्र असे धरिला, नाचे स्मरसागरवेला ॥
बोला चतुरा बोलवी चंद्रकला । कैसे मदनबले मंजुमंजुला ।
वनमाला बाला दावी लज्जा गाला स्मरलीला ॥



प्रेमसेवा शरण,Prem Seva Sharan sahaj jinki mala

प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास मी हो तुला

मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद

किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला

परवशता पाश दैवे,Paravashata Pash Daive

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥

असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥

सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥

मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥

जगी हा खास वेड्यांचा,Jagi Ha Khas Vedyancha

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा

कुणाला वेडकनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे

कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या निशेने धुंदली भारी

अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरीनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी

चंद्रिका ही जणु,Chandrika Hi Janu

चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥

चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥

शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।

आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥

आपदा राज-पदा भयदा, Aapada Raj Pada Bhayada

आपदा राज-पदा भयदा । नृपति कामभोग निरति ॥
लोपुनिया चिरसुखदा । दिव्य शीलसंपदा ॥

पापरता । पामरता । स्मरति, नरपति-
शिरि अरि सदा महा भया धरित- ॥