चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा !
आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा !
मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरुन जा !
प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते
ते हसू अन् आसवे ती - आज तू विसरून जा !
चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा !
No comments:
Post a Comment