Showing posts with label M-गोविंदराव टेंबे. Show all posts
Showing posts with label M-गोविंदराव टेंबे. Show all posts

या नाव नवल नयनोत्सव YA NAV NAYANOUTSAV

या नाव नवल नयनोत्सव

या नव नवल नयनोत्सवा

या नव नवल नयनोत्सवा ।

बघुनी मानस हे अनुभवत

अभिनवा मोहन कोमल भावा ॥

रणस्नेहाची, सुंदर युवती । आता करी समाप्ती ।

वाटे अस्त्रचि हे रिपुहाती । जिंकाया मम जीवा ॥

Lyrics -कृशंजी  प्रभाकर खाडिलकर  KRUSHANJI KHADILAKAR
Music -गोविंदराव टेंबे GOVINDARAO TEMBE
Singer -छोटा गंधर्व CHHOTA GANDHARW
Movie / Natak / Album -गीत GEET

हा टकमक पाही,Ha Takamak Pahi

हा टकमक पाही, सूर्य रजनिमूख, लाल लाल,
परि ती नाच जाई जवळी, म्हणत हा काळ काळ ॥

तनुवरी तारालंकार, त्यात भर फार इंदु होत, त्यास घालित माळ ॥

सवतचि भासे मला,Savatachi Bhase Mala

सवतचि भासे मला । दूती नसे ही माला ॥
नच एकांती सोडी नाथा । भेटू न दे हृदयाला ॥

शूरा मी वंदिले,Shoora Mi Vandile

शूरा मी वंदिले ।
धारातीर्थी तप जे आचरती ।
सेनापति यश याचि बले ॥

शिरकमला समरी अर्पिती ।
जनहित पूजन वीरा सुखशांती ।
राज्य सुखी या साधुमुळे, वंदिले ॥

शशिसूर्यप्रभा गगनाची,ShashiSuryaPrabha

शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी भूमितलावरिची ॥

मुखभानुवरा भालहिमकरा स्पर्शाया न धजे ही काया ॥

हे चरण मला रविचंद्रकला, सेवा योग्य गमे यांची ॥

वरि गरिबा वीरा जी अबला,Vari Gariba Veera Ji Abala

वरि गरिबा वीरा जी अबला, सुख संसारीं तें केंवि तिला ॥

राघव तोडित धनु ऋषिवेषें, मग जाई वना सीताबाला ॥

अधन धनंजय मीनवधा करी, वनीं वास मग पांचालीला ॥

रवि मी हा चंद्र कसा,Ravi Mi Ha Chandra Kasa

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥

त्या जे न साधे गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी ।
अबलाबल नव हे भासे ॥



युवतिमना दारुण रण,Yuvatimana Darun Ran

युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले ।
रणभजना संसारी असे अमर मी केले ॥

रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी;
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥

या नव नवल नयनोत्सवा,Ya Nav Naval Nayanotsava

या नव नवल नयनोत्सवा ।
बघुनी मानस हे अनुभवत
अभिनवा मोहन कोमल भावा ॥
रणस्नेहाची, सुंदर युवती । आता करी समाप्ती ।
वाटे अस्त्रचि हे रिपुहाती । जिंकाया मम जीवा ॥

मी अधना न शिवे भीती,Mi Adhana Na Shive Bhiti

मी अधना, न शिवे भीती मना;
योग्या धना चौर्यचिंतना ॥

रवि हिमकरही भययुत ग्रहणी,
भय नच ते दीपमना,
समयी त्या दीपमना ॥

मितभाषिणी तीच,Meet Bhashini Teech

मितभाषिणी तीच कुलकामिनी । गृहिणी ।
रुचिर वय वदुनि भूषवि । स्वकुल कुलाचार राखोनी ॥

केवि मिळे त्या जनी मान्यता । अविनय ज्या वरिती वाक्यपटुता ।
कुलकलंकिनी ठरती वनिता । मिरविती सदाचार सांडोनी ॥

माता दिसली समरी विहरत,Mata Disali Samari Viharat

माता दिसली समरी विहरत, नेत सकल नरवीर रणासि ॥

मस्तकमाला गुंफित कालमहेश्वर पतिसेवेसि ॥

शिकवित भक्ता रणलीला जणु भीषणयुद्धकलेसि ॥

मला मदन भासे हा,Mala Madan Bhase Ha

मला मदन भासे हा मोही मना ।
मानी जना या भामामना ॥

करी सनाथा मज; तुडवी हा चरणरजासम, मानी मना ॥
प्रीतचि पाया रणप्रासादा; दे पदसेवा प्रेमीजना ॥



मन हो रामरंगी,Man Ho Ram Rangi

मन हो रामरंगी रंगले,
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले

चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबुजातले
भवतरंगी रंगले



मधुसूदना हे माधवा,Madhusudana He Madhava

मधुसूदना हे माधवा । हे चक्रपाणी सुरम्य सुदर्शन ।
सूर्यसुधाकर लोचना ॥

वसना विणोनी शिणल्या सुरामा ।
सति रुक्मिणी ही तशी सत्यभामा ।
तव सिद्ध जाया मम रक्षणा ।
वैरी करिल तरि कृष्ण वदना ॥

भाली चंद्र असे धरिला,Bhali Chandra Ase Dharila

भाली चंद्र असे धरिला, नाचे स्मरसागरवेला ॥
बोला चतुरा बोलवी चंद्रकला । कैसे मदनबले मंजुमंजुला ।
वनमाला बाला दावी लज्जा गाला स्मरलीला ॥



प्रेमसेवा शरण,Prem Seva Sharan sahaj jinki mala

प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास मी हो तुला

मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद

किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला

प्रेमभावे जीव जगी या,Prem Bhave Jeev Jagi Ya natala

प्रेमभावे जीव जगी या नटला । एकचि रस प्याला ॥

नसती भिन्न रस हे, शृंगारराजा नवदल ल्याला ॥

सकला किरणरंगा दावी इंद्रधनुषी जननयनाला ॥

प्रिया अपराधी मी ती,Priya Aparadhi Mi Ti

प्रिया अपराधी मी ती भामिनी ॥

घ्याहो पदरी मजला, विमला सुसमागमें समजुनी ॥

पाही सदा मी परि केवि,Pahi Sada Mi Pari Kevi

पाही सदा मी परि केवि नाथ भासे मला नवोनव ॥

स्वरूपगर्वा करि अदय धावा ।
दे भूषणसहाया हतबलहृदया डाव हा मांडिला ॥