Showing posts with label M-भास्करबुवा बखले. Show all posts
Showing posts with label M-भास्करबुवा बखले. Show all posts

लाजविले वैर्‍यांना LAJAWILE VAIRYANNA

लाजविले वैर्‍यांना,

उरेना कामना ॥

सदा आनंद मला,

सुखाला संपूर्णाला सेवित आले ।

न्यून भासले, नाही देखिली रिपुविडंबना ॥

लाजविले वैर्‍यांना,

उरेना कामना ॥

सदा आनंद मला,

सुखाला संपूर्णाला सेवित आले ।

न्यून भासले, नाही देखिली रिपुविडंबना ॥

Lyrics -कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर KRUSHNAJI PRABHAKAR KHADILAKAR
Music -भास्करबुवा बखले BHASKARBUWA BAKHALE
Singer -कीर्ती शिलेदार KIRTI SHILEDAR
Movie / Natak / Album -द्रौपदी DROPADI

स्वकुल तारक सुता,Swakul Tarak Suta

स्वकुल तारक सुता; सुवरा वरुनि वाढवी वंश वनिता ॥
सुखविला नच जनक, न माता, ऐशी कांता नरकरता ॥

सुजन कसा मन चोरी,Sujan Kasa Man Chori

सुजन कसा ? मन चोरी ।
अग हा - चोरी - यदुकुलनंदन ॥

सहज नेत्र भिडे, सहज मोह पडे,
सहजचि करी मम हृदय हे वेडे;
विलीन-लोचन-मार्गे शिरत घरी ॥

वैरि मारयाला,Vairi Marayala

वैरि मारयाला, ही गोशाला ॥

प्रमुदित माता, रिपुबल मनवितां ।
करि मृदुल दूध अरि वध, सबल अबला ॥

विराट ज्ञानी हा कोंदटला,Virat Dnyani

विराट ज्ञानी हा कोंदटला सुमनीं ॥

सुमन रेणु चराचर भुवनीं
परि तें कृष्ण जाण
कणकण असे महाजन
कारण मागे उभा धनी ॥

लपविला लाल गगन-मणि, Lapavila Laal Gagan Mani

लपविला लाल गगन-मणि, परि दिन अशुभ होत नच,
दृष्टि न विफला; मगध-समरपति नव रवि उगवला ॥

योग्यचि वर मम, सुखविल बाला;
शुभ दिन अजि सुता; वारिल बघ शिशुपाला ॥

रूप बली तो नरशार्दुल,Roop Bali To NaraShardul

रूप बली तो नरशार्दुल साचा, क्षणीं विनाशित रिपुभाव मनिचा ॥

खला देखी, मग भूल फेंकी, नयन-भाषण मनासि जिंकी,
क्षणी विनाशित स्वभाव रिपुचा ॥

रमणि मजसि निजधाम,Ramani Majasi Nijdham

रमणि मजसि निजधाम, सन्मुख रुक्मिणी ॥

नयनें बोले स्वागत केलें; नरवरा, करा आराम ॥

मम सुखाचि ठेव,Mam Sukhachi Thev

मम सुखाचि ठेव, देवा, तुम्हापाशीं ठेवा;
ती स्मृतिवरि लिहावी, ममकारणे, जनकनांवा ॥

अखिलहि खर्चचि करि, आप्त-देव-धर्म-वैभवी;
वर अजि हा असा मला द्यावा ॥

मम मनीं कृष्ण सखा,Mam Mani Krishna Sakha

मम मनीं कृष्ण सखा रमला;
नच रणीं आप्तवधा सजला ॥

नवल नाहीं, नच दृष्य इतरां झाला;
धन झालें; शिशुपाल समजे भोळा ॥



मम आत्मा गमला हा,Mam Aatma Gamala

मम आत्मा गमला हा, नकळत नवळत हृदय तळमळत,
भेटाया ज्या देहा ॥

एकचि वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला, भाव दुजा मिटला,
वाटे प्राणसखा आला परतुनि गेहा ॥



प्रेम नच जाई तेथें,Prem Nach Jai Tethe

प्रेम नच जाई तेथें,
जिवासी जीव न जडे जेथें ।

अनुसरतांना जडतें नातें;
जीवा जीव एक कार्य भेटवितें ॥

नृपकन्या तव जाया,Nrupkanya Tav Jaya

नृपकन्या तव जाया, सुखविलासी सोडीना विनया, आर्या; ॥

वस्त्राच्छादना विरल कराया; भिजवितां कां मम काया ॥

नाथ हा माझा मोही,Nath Ha Majha Mohi

नाथ हा माझा मोही खला; शिशुपाला भारी झाला
वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥

वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणू हा त्याला ॥

नरवर कृष्णासमान,Naravar Krishnasaman

नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा,
भाग्य उदेले हे, शिकवी सुकर्मा ॥

बहुत नृपति ते आले गेले,
परि मनाला यदुवर झाला मंत्र महान ॥

त्वरा करा नाथा,Tvara Kara Natha

त्वरा करा नाथा, तुझिया नावा मळवितो राहू खरा ॥

जगविल आशा मजला नच आता, गमविता वेळ जरा ॥

जा भय न मम मना,Ja Bhay Na Mam Mana

जा, भय न मम मना; मंडप सबल,
समरानल महाज्वालें जळेना ।

शिशुपाल वैराग्नि पेटला,
भेटला जणु कृष्णबल-सागर तयाला ॥

थाट समरिचा दावी नट That Samaricha Davi Nut

थाट समरिचा दावी नट साचा; परि येता

मग काळ करणिचा, लागतो नाट ॥




स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविले,

धनुला धरिले, मत्स्य दिसेना, बाण चढविना;

जय पावेना हा थयथयाट ॥

ठरला जणु मत्सर राजा Tharala Janu Matsar Raja

ठरला जणु मत्सर राजा; वृद्धतरुण बांधिती पूजा ॥




होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला

सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अज गेला ॥