कृष्णा मिळाली कोयनेला,Krishna Milali Koynela

कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं, सासरला

कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी
एकरूप झालं
आलिंगनी, बाई आलिंगनी,
ओळखायचं सांगा, कसं कुणी ?
संसारचं तीर्थ बांधलं

लक्ष पायऱ्या घाटाला

एका आईच्या पोटी येऊनि
ताटतुटी जन्मापासुनि
सासर, माहेर नाव सांगुनि

नयनी नातं गहिवरुनि
बहीण भेटली बहिणीला

शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णा माई

कोयना येई झुलवित डोई
मंगल घट ते, न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला