Showing posts with label S-वैशाली सामंत. Show all posts
Showing posts with label S-वैशाली सामंत. Show all posts

भुई भिजली BHUI BHIJALI



भुई भिजली भिजली
भुई भिजली भिजली
रुजला अंकुर उदरी पोर तृप्तिने माखली 
ओंजळ सुखाने भरली
घमघमला ग सुगंध जाई फुलली फुलली

हिरव्या हिरव्या रानात कळी निजे गं  पानात
जन्म फुलाचा होईल गं दरवळ जाईल विश्वात
राधेची की कृष्णाची गं बाई
होणार तू कोणाची गं आई
झाला बाई ऋतु सावळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा

जन्म अस्तुरीचा लाभला
जन्म अस्तुरीचा लाभला
कस्तुरीचा सुहास बाई चहु दिशात पांगला
कंथ तिचा गं गुणाचा
शोभतो साजिरा गं सुंदर जोडा ऱाघुमैनेचा
वंश वाढेल वाढेल दुडूदुडू धावेल घर त्याचे गोकुळ होईल
चक्र ऋतुचे फिरते गं वसंत हिरवा येतो गं
शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ  होते गं

सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा
भुलवितो अवघ्या संसारा
आला बाई ऋतु सावळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा

स्वप्नी पुनवेचा चांदवा
स्वप्नी पुनवेचा चांदवा
बाळ मुठीतून भरला खडीसाखरेचा गोडवा 
बाळ मुठीतून भरला खडीसाखरेचा गोडवा
माझी मालन लाडाची मथनीने घुसळिते नि करिते संसार लोण्याचा
हळदी कुंकुवाची कोयरी सौभाग्याचे दान लेऊनी उजळविते घरदारा
भावबंध हे गहिरे गं गोफ तयांचा विनला गं
मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला गं
लक्ष्मीनारायणाची गं जोडी
पंचामृताची गं तिला गोडी
सुखाच्या या लागल्या कळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू  हळू झुलवा गं हिंदोळा


Lyrics -संगीता बर्वे  SANGITA BARVE
Music -अविनाश विश्वजीत AVINASH VISHVJIT
Singer -वैशाली सामंत VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -इश्क़ वाला लव  ISHQ WALA LOVE 

ASE KONI असे कोणी



असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही
हाक कुणाची  कानी येते 
अलगद कोठे घेऊन जाते

असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
हे ना जरी ओळखीचे वाटते
हे का परि वाटते आपुले
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

तुझे बहरणे तुझे निरखणे
किती हवेसे वाटते
तुझे निरखणे माझे बहरणे
ओळखीचे वाटते
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

भास कि खरे हे सांग एकदा रे
मार्ग हा कोणता बोल ना  रे
साथ जन्मजन्माची साक्ष ही मनाची 
सांगते ही धरा बोलते आभाळ किती काय राणी
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही

बघता बघता जादू घडते
बघता बघता भूल पडते
बघता बघता सर ही झरते
बघता बघता मन मोहरते

Lyrics - SANDEEP KHARE संदिप खरे
Music -S.J.SURYA एस. जे.सूर्या
Singer -VAISHALI SAMANT,VISHWJIT JOSHI वैशाली सामंत ,विश्वजीत जोशी
Movie / Natak / Album -ISHQ WALA LOVE  इश्क़ वाला लव 

बेचैन हळव्या लाटा BAICHAIN HALVYA LATA

बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा, ह्या निराकार ठश्यांचा

सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या, भारलेल्या
गीत गातात कुणाचे, ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा ….

शुभ्र ताऱ्यांचा काफिला, दूर जाताना बोलला
सांगता हिच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा


Lyrics -वैभव जोशी  VAIHAV JOSHI
Music -अवधूत गुप्ते AVADHUT GUPTE
Singer -वैशाली सामंत VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -गीत GEET

एैका दाजीबा



आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
दाजी दाजी

मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा
मुझे प्यार नाही तुझसे हेवा
मुझे दिल विल नको तेरा देवा 
 एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
 एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा

किती आइले किती गइले
किती आइले बाबा किती गइले
किती आइले किती गइले
किती आइले बाबा किती गइले

सबको लगता है ,हम हीच पहिले
सबको लगता है ,हम हीच पहिले
सब केहते हे मेरी मेहबूबा
तेरी आँखों में मेरा दिल डूबा
अो तेरी आँखों में मेरा दिल डूबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा

तुझ्या घरात नाही पानी   ,तुझ्या घरात नाही पानी 
घागर उताणी रे ,उताणी रे  दाजीबा
कटकट नको मचमच नको
गड़बड़ नको तेरी बड़बड़ नको
कटकट नको मचमच नको
गड़बड़ नको तेरी बड़बड़ नको

है जो हिम्मत तो करले मुझे बायको
करके बायको तू लेजा मुझे घरको
फिर में बायली तेरी तू मेरा बाबा
फिर जो बोले सो  मेरा सायबा
फिर जो बोले सो  मेरा सायबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा
एैका दाजीबा एैका दाजीबा एैका दाजीबा

Music - अवधूत गुप्ते AVADHOOT GUPTE
Singer -वैशाली सामंत VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -दाजीबा DAJIBA

तुझ्या वीणा TUJHYA VINA



तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

भास  का हा तुझा होत असे  मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झाली अनोळखी माझीच मला मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

भास  का हा तुझा होत असे  मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझाच मला मी
वाटे मला का व्यर्थ  सारे सांगना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरी ही कसा सांगना जीव हा गुंतला
उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरी ही कसा सांगना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
काहे बदलले अर्थ सारे सांग ना
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली 
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना

तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा
तुझ्या वीणा तुझ्या वीणा

Lyrics -अमोल पाठारे AMOL PATHARE
Music -निलेश मोहरीर NILESH MOHAHIR
Singer -वैशाली सामंत ,मंगेश बोरगावकर VAISHALI SAMANT,MANGESH BORAKAR
Movie / Natak / Album - एका लग्नाची दुसरी गोष्ट EKA LAGNACHI DUSARI GOSHT                                      

















































रंग खेळू चला



सख्या चला बागामधी रंग खेळू चला,
सख्या चला बागामधी रंग खेळू चला,
रंग खेळू चला,रंग खेळू चला,
रंग खेळू चला,रंग खेळू चला,
रंग खेळू चला,रंग खेळू चला,
सख्या चला बागामधी रंग खेळू चला,

मोहे मोहे तू रंग दे बसंती ,मोहे मोहे तू रंग दे बसंती,
मोहे मोहे तू रंग दे बसंती ,मोहे मोहे तू रंग दे बसंती ,
मोहे मोहे तू रंग दे बसंती ,मोहे मोहे तू रंग दे बसंती ,
मोहे मोहे तू रंग दे बसंती ,मोहे मोहे तू रंग दे बसंती ,

अहो कुण्या गावचं आल पाखरू ,
कुण्या गावचं आल पाखरू ,
बसलयं डौलात न ,
खुदुखुदु हसतय गालात,
बसलयं डौलात न ,
खुदुखुदु हसतय गालात,

कसं लबाड़ खुदुखुदु हसतय,
कसंकसं बघतयं
आपल्याच नादातं  ग बाई बाई
आपल्याच नादातं
कुण्या गावचं आल पाखरू ,
अहो कुण्या गावचं आल पाखरू

चैन खुली कि मैंन खुली
मैंन खुली  कि चैन खुली
चैन खुली कि मैंन खुली चैन
दिल का पंछी करे धमाल
पिंजरडे  में ना इसको डाल
लड़ जाने दो लड़ते है जो नैन
दिल का पंछी करे धमाल
पिंजरडे  में ना इसको डाल
लड़ जाने दो लड़ते है जो नैन
मौज मनाये धूम मचाये
मस्ती में काटे दिन रेन
ओहो ओहो ओहो
मस्ती मस्ती मस्ती मस्ती मस्ती
मस्ती मस्ती मस्ती मस्ती मस्ती
मस्ती मस्ती मस्ती मस्ती मस्ती

नाचू किती नाचू किती कंबर लचकली
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
अहो ठेस लागली जाता जाता जोडवी टचकली 
बाई माझी  जोडवी टचकली
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
नाचू किती नाचू किती कंबर लचकली

नच बलिये ,ये चूड़ियाँ चाडादु
नच बलिये ,ये नदियां कना दू
नच बलिये ,ये झांजरा पवा दु
नच बलिये ,ये चूड़ियाँ चाडादु
नच बलिये ,ये नदियां कना दू
नच बलिये ,ये झांजरा पवा दु
नच बलिये ,ये चूड़ियाँ चाडादु
नच बलिये ,ये नदियां कना दू
नच बलिये ,ये झांजरा पवा दु
नच बलिये

Lyrics -प्रवीण दवणे PRAVIN DAWANE
Music -श्रीरंग आरस  SHRIRANG AARAS
Singer -वैशाली सामंत,स्वप्निल बांदोडकर VAISHALI SAMANT,SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album -लपून छपूण LAPUN CHAPUN

इलू इलू दोघातलं ILU ILU DOGHATAL



इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल

प्रीतीचे गीत हे,साजनी मोहिनी ऐ कणा
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
जागले सुर हे ,साजना मोहना ऐकणा
इलू इलू दोघातलं

घाली पिंगा बोले  भुंगा ,
राणी तुझिया आय लव यु
हिरव्या राणी गाऊ गाणी
मी तुझी रे नी माझाच तु
मी तुझी रे नी माझाच तु

घाली पिंगा बोले  भुंगा ,
राणी तुझिया आय लव यु
हिरव्या राणी गाऊ गाणी
मी तुझी रे नी माझाच तु
मी तुझी रे नी माझाच तु
परवा कुठली आता, घेणा जवळ ये मला
प्रीतीचा पाखरा ,इलू इलू दोघातलं

झुलतो झोका ,झुकतो ठोका
माझा राजा आय लव यु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
झुलतो झोका ,झुकतो ठोका
माझा राजा आय लव यु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु


साथ रंगातली ,बात डोळ्यातली
साथ देईल तुला ,इलू इलू दोघातलं
बोलू बोलू  मनातलं 
प्रीतीचे गीत हे,साजनी मोहिनी ऐकणा
इलू इलू दोघातलं

Lyrics -प्रवीण दवने PRAVIN DAWANE
Music -श्रीरंग आरस  SHRIRANG AARAS
Singer -वैशाली सामंत ,स्वप्निल बांदोडकर VAISHALI SAMANT,SWAPNIL BAMDODAKAR
Movie / Natak / Album -लपून छपून LAPUN CHAPUN

खारा शेंगदाणा KHARA SHENGADANA



नशा झाली अशी धुंद वेडीपीशी 
उंच उंच आकाशात उडताना
मज्जा वाटे भारी ,शुद्ध गेली सारी
दिसे जग गोल गोल फिरताना
झाली तुला ,झाली मला ,थोड़ी जरा झाली हिला
मस्त होऊन आज घालु धिंगाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा

झाले गेले सोडा आता ,नवा सोडा फोडा आता
मस्त होऊन आज घालु धिंगाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा

का हे   होई असे , एका जागी दोन दिसे   
का रे जग बघते होईल आपले खुब हसे
मी टाईट तु ही टाईट ,खर सांगू फूल टाईट

मस्त होऊन आज घालु धिंगाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा
मस्त होऊन आज घालु धिंगाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा
शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा दे खारा शेंगदाणा



Lyrics -श्रीरंग गोडबोले  SHRIRANG  GODABOLE
Music -अशोक पठकी ASHOK PATHAKI
Singer -वैशाली सामंत VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -फूल ३ धमाल FULL 3 DHAMAAL

मेघ दाटले,Megha Datale

मेघ दाटले ..... मेघ दाटले .....
जरी पावसाळा जुना शब्द आहे
तरी कांचपाणी नवे नित्य वाहे
जुन्या आठवांनी नवे होत जाते
तुझे आणि माझे असे एक नाते
तुला पाहताना पुन्हा वाटले
जुने मेघ काळे पहा दाटले
मेघ दाटले ..... मेघ दाटले .....



कुंपण,Kumpan

मूर्तीमंत भक्ती तू

भव्य दिव्य शक्ती तू

क्षमाशील पृथ्वी तू

हेम तूच, अग्नी तू



तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण

असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण

कळत नकळत,Kalat Nakalat

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती
मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते-
सारे कळत नकळतच घडते

कुणितरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले

साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले

पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत-वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हा पुन्हा मोहरते-

सारे कळत नकळतच घडते



अंगणी माझ्या मनाच्या,Angani Majhya Manachya

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी

पुकारे तुझी साजणी !

चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी !

गार वारा मन भरारा शिर्शिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी !

आभास हा छळतो तुला, Aabhas Ha Chalato Tula

कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा

कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा

छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू

पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !