Showing posts with label S-स्नेहल भाटकर. Show all posts
Showing posts with label S-स्नेहल भाटकर. Show all posts

वारियाने कुंडल हाले,Variyane Kundal Hale

वारियाने कुंडल हाले
डोळे मोडित राधा चाले

राधा पाहून भुलले हरी
बैल दुभवी नंदाघरी

फणस जंबिर कर्दळी दाटा
हाति घेऊन नारंगी फाटा

हरि पाहून भुलली चित्ता
राधा घुसळी डेरा रिता

ऐसी आवडी मिनली दोघा
एकरूप झाले अंगा

मन मिळालेसे मना
एका भुलला जनार्दना

मीलनास आपुल्या साक्ष,Milanas Aapulya Saksh

मीलनास आपुल्या साक्ष धवल चंद्रकोर
अक्षदा अन्‌ मंत्र नको, नको साक्षी सनई-सूर

का असे न ऋतू वसंत, मन कोकिळ गाइ गीत
रातकिडा देई साथ छेडुनिया एक सूर

धुंद गंध दरवळला लतामंडपी सगळ्या
भूषविते अधिक त्यास पुष्पशेज नक्षिदार

येई सखे.. ये समीप, नभ उजळीती लक्ष दीप
देहलता तव कापे स्पर्शताच पवन गार

पहाटेच्या या प्रहरी,Pahatechya Ya Prahari

पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि

रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली
फुलारली झाडे-वेली, जाग वारियासी आली
वेळ शितळ साजिरी पक्षी गाती नाना परि

गेला दिस नाही येत काही करावे संचित

साधा आपुणा रे हीत नाम वाचे उच्चारित
नाम घेता घरिदारी उभा विठ्ठल कैवारि

सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश
मुखे करा नामघोष जाति जळोनिया दोष
तुका म्हणे जन्मावरि ठेवा तुळस मंजिरि

ठाऊक नाही मज काही Thauk Nahi Maj Kahi

ठाऊक नाही मज काही !

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




मऊ जशी ती साय दुधाची,

होती आई का तशी मायेची ?

बागेतील ते कमल मनोहर,

आई होती का तशीच सुंदर ?

देवाघरी का एकटी जाई ?

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




चिउकाऊची कथा चिमुकली,

सांगत होती का ती सगळी ?

अम्हांसारखे शुभंकरोती,

म्हणे रोज का देवापुढती ?

गात असे का ती अंगाई ?

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




मऊ साइहुन आई प्रेमळ !

गंगेहून ती आहे निर्मळ

अमृताचे घास भरविते

आभाळापरी माया करीते

आईवाचून मीही विरही

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?

कांदा-मुळा-भाजी,Kanda Mula Bhaji

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी
अवघीं व्यापिली पंढरी

सावता म्हणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

काय तुझे उपकार,Kaay Tujhe Upkar

काय तुझे उपकार पांडुरंगा ॥
सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥


जतन हें माझें करूनि संचित ।
दिलें अवचित आणूनियां ॥२॥


घडल्या दोषांचे न घाली भरी ।
आली यास थोरी कृपा देवा ॥३॥


नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं ॥
न मागतां पाहीं दान दिलें ॥४॥


तुका म्हणे याच्या उपकारासाटीं ।
नाहीं माझें गाठीं कांही एंक ॥५॥



उंचनिंच कांहीं नेणे,Unch Ninch Kahi Nene

उंचनिंच कांहीं नेणे भगवंत ।
तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।
दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥२॥

चर्म रंगूं लागे रोहिदासा संगे ।
कबिराचे मागे विणी शेले ॥३॥


सजनकसाया विकुं लागे मास ।
मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥४॥

नरहरिसोनारा घडों फुकुं लागे ।

चोख्यामेळ्या संगे ढोरें ओढी ॥५॥

नामयाच्या जनी सवे वेची शेणी ।
धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥६॥


नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित ।
ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥७॥

अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी ।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥८॥

गौळियांचे घरीं अंगे गाइ वळी ।
द्वारपाळ बळी द्वारीं जाला ॥९॥


यंकोबाचें ऋण फेडी हृषिकेशी ।
आंबऋषीचे सोशी गर्भवास ॥१०॥

मीराबाइं साठी घेतो विषप्याला ।
दामाजीचा जाला पाडेवार ॥११॥

घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची ।
हुंडी मेहत्याची अंगे भरी ॥१२॥

पुंडलिकासाठीं अजुनि तिष्ठत ।
तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१३॥

अशक्य तों तुम्हां नाही,Ashakya To Tumha Nahi

अशक्य तों तुम्हां नाही नारायणा ।
निर्जीवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे ।

आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥

थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे ।
म्हणवितों दास काय थोडें ॥३॥


तुका म्हणे माझे निववावे डोळे ।
दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥

शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥५॥

ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावालों सखया ॥६॥

दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥

तुका देखोनि एकला । वैकुंठीहूनि हिर आला ॥८॥