Showing posts with label S-पं. उदयराज गोडबोले. Show all posts
Showing posts with label S-पं. उदयराज गोडबोले. Show all posts

अशी बायको हवी Ashi Bayko Havi

अशी बायको हवी

अशी, अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी !

पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन्‌ लाघवी
अशी, अशी बायको हवी !

नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी, सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी
अशी, अशी बायको हवी !

Lyrics - Pralhad Keshav Atre प्रल्हाद केशव अत्रे
Music - Vasant Desai वसंत देसाई
Singer - Pandit Udayraj Godbole पं. उदयराज गोडबोले
Natak - अशी बायको हवी !

नाजुक ऐशा या जखमेला,Najuk Aisha Ya Jakhamela

नाजुक ऐशा या जखमेला दवा नको पण दुवा हवा

निर्लेप अशा हृदयावरती मृदुल करांचा लेप हवा
या जखमेला तुझ्या प्रीतिचा असा मुलायम मलम हवा !

नको कुणी वेदना विशारद, नको कुणी तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणी परि प्रणयाचा मांत्रिक हवा !

देह देवाचे मंदिर,Deh Devache Mandir

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥

कृष्ण माझी माता,Krishna Majhi Mata

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥

कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥

तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटो ना करावा परता जीवा ॥४॥