कृष्णा पुरे ना, थट्टा किती ही
खडा घड्याला मारु नको
या राधेला अडवु नको
जळामृते हा घट भरलेला
घेउन जाणे मजसि घराला
सोड वाट रे झणि गोपाळा
घरी परतण्या उशिर नको
हिसळत जळ हे, भिजते साडी
असली कसली भलती खोडी
काय वाटते तुजला गोडी
वृथा मुकुंदा छळु नको
तुझ्या संगती क्षणभर येता
विसरुन जाते काम सर्वथा
ओढ लागते माझ्या चित्ता
भुरळ मनाला पाडु नको
No comments:
Post a Comment