कृष्णाकाठी दत्तगुरुंचा,Krishnakathi Duttaguruncha

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्त्य असे संचार
सुकृत आले फळास माझे, घडला साक्षात्कार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

योगीराज श्री समर्थस्वामी, अवचित आले माझ्या सदनी
पदस्पर्शाने झाले पावन मम जीवन संसार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

वैराग्याची सोज्वळ मूर्ती, अपार करुणा ह्रदयी प्रीती
प्रणव सुरांतुनी जगा दाविती विश्वरुपाचे सार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

अंतर साक्षीत्वाचा प्रत्यय सदा देती मज अखंड अक्षय
सार्थकतेचे अश्रू बघती, आत्मऐक्य साकार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार

No comments:

Post a Comment