Showing posts with label सुरेश वाडकर. Show all posts
Showing posts with label सुरेश वाडकर. Show all posts

वेगळ्या जगात या VEGALYA JAGAT YA

वेगळ्या जगात या अशी कशी दंगले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले

वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

भरारून झेप घेई पाखरू मनाचे
दाही दिशा मोकळ्या या बंध ना कुणाचे
स्वप्‍न आज प्रीतीचे लोचनांत जागले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले

झाड-वेल-फूल-पाने कुजबुजू बोलती
तुझे-माझे गुपित हे कानामधी खोलती
एकांती संगतीचे वेड जणु लागले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

झोका घेई फांदीवर प्रीत माझी साजणा
मिठीमधे रेशमाच्या येशील का सांग ना?
स्पर्श हा नवानवा रोमरोम झिंगले
धुंद या स्वरात मी आज रंग-रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग-दंगले

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -विश्वनाथ मोरे VISHVNATH MORE
Singer -आशा भोसले,सुरेश वाडकरAASHA BHOSALE,SURESH WADEKAR
Movie / Natak / Album -बंदिवान मी या संसारी BANDHIVAN MI YA SANSARI

BHANNAT RANVARA MASTIT

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली

येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्‍च जाळी काळोख दाट झाला
काळोख गंधाळला काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

Lyrics -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Music -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Singer -उत्तरा केळकर, सुरेश वाडकर UTTARA KELAKAR,SURESH WADAKAR
Movie / Natak / Album -कशासाठी प्रेमासाठी KASHASATHI PREMASATHI

मी भिजून पूरी MI BHIJUN PURI

मी भिजून पूरी आता झाले ओली
चल पाण्यावर तरंगत न्हाऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आली मनात जाग पेटली उरात आग
रानमाळावरी खुलून आलीया बाग 
जरा भुंग्यांची गमंत पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

आज कसलं तुझ्या वेड आलं मनी 
उशीर झाला किती कसं नाही ध्यानी
माझ्या मार्गात नको ग येऊ
रागारागानं नको रे पाहू 
घडीभरानं घरला जाऊ
जरा जवळ जवळ ये ना

का रे माझ्या ,रुसला कशापायी
वारा झोंबतो मला जरा कर घाई 
कसा समाजाऊं असा येडा ह्यो पोर 
तुझ्या खेळापाई माझा खचतो ग धीर  
तुला उचलू का कडेवर घेऊ
रागारागानं नको रे पाहू
घडीभरानं घरला जाऊ

Lyrics -उमाकांत काणेकर UMAKANT KANEKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर ,सुरेश वाडकर USHA MANGESHKAR,SURESH WADAKAR                    
Movie / Natak / Album -कडकलक्ष्मी  KADAKLAKSHMI

ये रे ये रे सोन्या ये रे ये रे YE RE YE RE SONYA YE RE YE RE




राजसा दिलबरा  आ दुरावा असा ,जवळी घे ना  मला
राजसा दिलबरा  आ दुरावा असा ,जवळी घे ना  मला
अंतरी  आग हि ,ये रे ये रे सोन्या ये रे ये रे
ये रे ये रे सोन्या ये रे ये रे

रेशमी ही मीठी वेड लावी  जीवा
तोच  हृदयी हवा, वादळी ही नशा
दुर का रे असा ,
प्रीतीच्या  पाखरा ,रात थांबून धुंद होऊदे  सख्या  रे ,
दुर जाऊ दे प्रीत राहु दे ,
सख्या   रे
अंतरी  आग हि ,ये रे ये रे सोन्या ये रे ये रे
ये रे ये रे सोन्या ये रे ये रे

धक धक होतय ,कळेना काही
गुलु गुलु बोलु ,अग सांगतोय कानी
धक धक होतय ,कळेना काही
गुलु गुलु बोलु ,अग सांगतोय कानी

तुझ्या वीणा करमेना ग ,माझे रानी
हळु हळु ही उमलु दे ना प्रेम कहानी
तुझ्या वीणा करमेना ग ,माझे रानी
हळु हळु ही उमलु दे ना प्रेम कहानी

प्रीतीला जाग येईन
ये रे ये रे सोन्या ये रे ये रे
ये ग ये ग  सोनी  
ये रे ये रे सोन्या ये रे ये रे

Lyrics -प्रवीण दवणे PRAVIN DAWANE
Music -श्रीरंग आरस  SHRIRANG AARAS
Singer -अनुराधा पौडवाल ,सुरेश वाडकर ANURADHA PAUDAWAL,SURESH WADAKAR
Movie / Natak / Album -लपून छपुन  LAPUN CHAPUN