Showing posts with label S-पं. भीमसेन जोशी. Show all posts
Showing posts with label S-पं. भीमसेन जोशी. Show all posts

हरिनामवेली पावली विस्तारी,Harinam Veli Pavali Vistari

हरिनामवेली पावली विस्तारी ।
फळीं पुष्पीं भार बोल्हावली ॥१॥

तेथें माझ्या मना होइ पक्षिराज ।
साधावया काज तृप्तीचें या ॥२॥

मुळिचिया बीजें दाखविली गोडी ।
लवकर चि जोडी जालियाची ॥३॥

तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ ।
गोडी ते रसाळ अंतरेल ॥४॥

संपले जीवन संपली,Sampale Jeevan Sampali

संपले जीवन संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा

उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा

चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
पडो देह माझा तुझे गुण गाता

नको जिणे झाले मिटु दे हे पान
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता

सुखाचें हें नाम आवडीनें,Sukhache He Naam

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥

आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

सुख अनुपम संतांचे,Sukha Anupam Santanche

सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्त माया मोह रस ।
ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

सावळें सुंदर रूप,Savale Sundar Roop

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥

जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आम्हांसी सहज द्यावें आतां ॥३॥

तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥४॥

सगुणाची सेज निर्गुणाची,Sagunachi Shej Nirgunachi

सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥

हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥

निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥

शोधितो राधेला गोपाल,Shodhito Radhela Gopal

सोडुनी आपुला राजमहाल
शोधितो राधेला गोपाल

माझ्यावरती असे कोणते
घडले मायाजाल

निळ्यासावळ्या आभाळाहुन
आपुले प्रेम विशाल

शून्य गोकुळी येईल पुन्हा
हसरी सोनसकाळ

वैष्णवां घरीं सर्वकाळ,Vaishnava Ghari

वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ॥१॥

कण्या भाकरीचें खाणें ।
गांठी रामनाम नाणें ॥२॥

बैसावयासी कांबळा ।
द्वारी तुळसी रंगमाळा ॥३॥

घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु ॥४॥

फराळासी पीठ लाह्या ।
घडी घडी पडती पायां ॥५॥

नामा म्हणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलापायीं ॥६॥

विठ्ठलाच्या पायी थरारली,Vitthalachya Payi Thararali

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
राउळीची घाट, निनादली ॥१॥

ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ
इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥

उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात
तुका समाधीत, चाळवला ॥३॥

सज्जनगडात टिटवी बोलली
समाधी हालली, समर्थांची ॥४॥

एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत
भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥

अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥

संत-माळेतील मणी शेवटला
आज ओघळला, एकएकी ॥७॥

विठ्ठल हा चित्तीं,Vitthal Ha Chitti

विठ्ठल हा चित्तीं ।
गोड लागे गातां गितीं ॥१॥

आम्हां विठ्ठल जीवन ।
टाळ चिपुळिया धन ॥२॥

विठ्ठल विठ्ठल वाणी ।
अमृत हे संजीवनी ॥३॥

रंगला या रंगे ।
तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठल गीतीं गावा,Vitthal Giti Gava

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥

अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥

तो चि शरणांगतां हा विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥

विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

रामाचें भजन तेंचि,Ramache Bhajan Techi

रामाचें भजन तेंचि माझें ध्यान ।
तेणें समाधान पावईन ॥१॥

रामासी वर्णितां देहीं विदेहता ।
जाली तन्मयता सहजचि ॥२॥

राघवाचें रूप तें माझें स्वरूप ।
तेणें सुखरूप निरंतर ॥३॥

रामदास म्हणें मज एणें गती ।
राम सीतापतीचेनि नामें ॥४॥

रात्रंदिन आम्हां युद्धाचा,Ratrandin Aamha

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥

जीवाही अगोज पडती आघात ।
येऊनिया नित्य नित्य करि ॥२॥

तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे ।
अवघीयांचे काळे केले तोंड ॥३॥

राजस सुकुमार मदनाचा,Rajas Sukumar Madanacha

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥

कासे सोनसळा पांघरे पांटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥



रसिका गाऊ कोणते,Rasika Gau Konate

रसिका गाऊ कोणते गीत ?
तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !

जुळल्या तारा पहिल्या भेटी
राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी आठवता ती प्रीत !

तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना
आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !

रम्य ही स्वर्गाहून लंका,Ramya Hi Swargahuni

रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तिच्या सागर लहरी नादविती डंका

सुवर्ण कमलापरी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका

लक्ष्मी-लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?



याजसाठी केला होता अट्‍टहास,Yajsathi Kela Hota Attahas

याजसाठी केला होता अट्‍टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

माझे माहेर पंढरी,Majhe Maher Pandhari

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥५॥



माझा भाव तुझे चरणी,Majha Bhaav Tujhe Charani

माझा भाव तुझे चरणी ।
तुझे रूप माझे नयनी ॥१॥

सापडलो एकामेका ।
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥

त्वा मोडिली माझी माया ।
मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥

त्वा मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयी ॥४॥

नामा म्हणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥

मन हो रामरंगी,Man Ho Ram Rangi

मन हो रामरंगी रंगले,
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले

चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबुजातले
भवतरंगी रंगले