Showing posts with label S- उषा मंगेशकर. Show all posts
Showing posts with label S- उषा मंगेशकर. Show all posts

अहो राया चला AHO RAYA CHALA

रात अशी बहरास राजसा
तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला
घोड्यावरती बसु

अहो राया चला,घोडयावरती बसु
घोडयावरती बसू
नवा देखना आणा घोडा
जीन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकिब खाली सोडा
उगा वाटत खूप फिराव
नकाच काही पुसु
अहो   नकाच काही पुसु
अहो राया चला,घोडयावरती बसु

अहो राया चला,घोडयावरती बसु
घोडयावरती बसु
मंदिल चढ़वा बांधा शैला
उचलून घ्या ना पुड्यात मजला
हलक्या हतान विळखा घाला
मिठीत येईल पुनम नभीची
कसल आल हसु
 अहो  कसल आल हसु
अहो राया चला,घोडयावरती बसु
अहो राया चला,घोडयावरती बसु
अहो राया चला,घोडयावरती बसु

Lyrics - दादा कोंडके  DADA KONDKE
Music - राम कदम   RAM KADAM
Singer - उषा मंगेशकर  USHA  MANGESHAKAR
Movie / Natak / Album - सोंगाडया  SONGADYA

तुजसी मी प्रीत सख्या TUJASI MI PRIT SAKHYA

तुजसी मी प्रीत सख्या,आज करणार ना  
मन माझे अदय प्रिया,मुळी झूरनार ना 
अनुदिन मोहित करुण,फिरून,फिरून करिसी वंचना ! 

भुलविति वचने तुझी,खोटे खोटे हासणे रे 
भोळी खुळी प्रीत माझी, पुन्हा पुन्हा फसने रे
आसवांत न्हाउन न्हाउन,सतत साहुनी विरह वेदना! 

मधुमय जीवन हसे,मधुर मधुमास हा
तनुवर लहरत ये,हरित मधुर भास हा 
भिरभिर वाहतो,पवन मजसी वाहतो 
साद त्या देईन दु;ख ते साहीन,हसत राहिन पुसुनी लोचना !

हदया हसत रहा, हसत रहा सारखा
बघतो वळून पुन्हा,तो सुखास पारखा 
नित नित सूर नवे,नवे क्षितिजहि हवे 
कधी न झुरेन,स्वैर मी फिरेन,तुला न स्मरेण ऐक साजना !

Lyrics -शांता शेळके  SHANTA SHELAKE
Music -मानस मुखर्जी  MAANAS MUKHARJI
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPU





ओढाळ आकाश ODHAL AAKASH

 ओढाळ आकाश झुरे सांजवेळी, ओळ अंतराळी  झेपावते

खिन्न प्रकाशाची थरारे साउली,डोळ्यांची बाहुली ओलावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

लकाकती जेथे दिवे कापुराचे तले प्रकाशाचे नादावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

ऐलपैल नाही दिशांच्या  प्रवाही,तरी मज काही बोलावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

 Lyrics -प्रवीण दवणे   PRAVIN DAVNE                       
Music - अनिल मोहिले   ANIL MOHILE
Singer - उषा मंगेशकर    USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU