Showing posts with label S-वाणी जयराम. Show all posts
Showing posts with label S-वाणी जयराम. Show all posts

उठा उठा हो सूर्यनारायणा UTHA UTHA HO SURYNARAYANA

उठा उठा हो सूर्यनारायणा

थांबली सुवासिनी पूजना

किरणहार हे गुंफित आली

उषासुंदरी धुक्यात न्हाली

नवरंगांची उधळण झाली गगनाच्या अंगणा

विझल्या तारा, वाहे वारा

शोधीत पक्षी चिमणा चारा

घरोघरीच्या अमृतधारा भूषविती गोधना

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -वाणी जयराम WANI JAYARAM
Movie / Natak / Album -सून माझी सावित्री SUN MAZI SAVITRI

सुखाचें हे सुख श्रीहरी,Sukhache He Sukh Shri

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥

भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥

चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥

नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

माळते मी माळते,Malate Mi Malate

माळते, माळते !
माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते !

टपटप धरणी वरती
सांडून गेले घुंगुर अवतीभवती
या धारांना, या धारांना
या धारांना छातीस कवटाळिते !

सरसर या सरीखाली
रुजेन बाई मी तर ओली ओली
या दंडावरी, या दंडावरी
या दंडावरी जणू गाणे रोमांचते !

उतरले बालपण माझे हे खालती, खालती
या आईला, या आईला
या आईला फुटले पान्हे किती
आकाशीच्या या काचेच्या
या काचेच्या चांदण्यास मी चुंबिते !



प्रेमपिसें भरलें अंगीं,Prem Pise Bharale

प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतेसंगें नाचों रंगीं ॥१॥

कोणे वेळे काय गाणें ।
हे तों भगवंता मी नेंणे ॥२॥

वारा धावे भलतया ।
तैसें माझी रंग छाया ॥३॥

टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आम्ही गातो पश्चिमेकडे ॥४॥

बोले बाळक बोबडे ।
तरी ते जननीये आवडे ॥५॥

नामा म्हणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥

प्रियतम दर्शन देई,Priyatam Darshan Dei

प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही

कमळ जळाविण, शशिविण रजनी
तशी बावरी तुजविण सजणी

रात्रंदिन व्याकूळ भटकते विरह काळजा जाळी

दिवसा भूक न रात्री निजणे
ओठ विसरले सर्व बोलणे
काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई

हृदयेश्वर, का मज कष्टविसी
भेट एकदा सदया मजसी
जन्मजन्मिची मीरा दासी, पडते तुझिया पायी

नच साहवतो हा भार,Nach Sahavato Ha Bhar

नच साहवतो हा भार
गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार

ओठ जरी हे माझे होते
सूर उरी हे तुझेच होते
तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्‌गार

स्वप्नावाचुन आता डोळे
चंद्रावाचुन अंबर काळे
वाट तृषेची कठीण, नसता जवळ मेघमल्हार

सरले दिन ते मंतरलेले
पुन्हा परीची शिळा जाहले
तुझ्यामुळे मी वीज जाहले, तुझ्यामुळे अंधार

काय माझा आता,Kaay Majha Aata

काय माझा आता पाहतोसी अंत ।
येईं बा धांवत देवराया ॥१॥

माझ्या जीवा होय तुजविण आकांत ।

येईं बा धांवत देवराया ॥२॥

असे जरी काम भेटूनियां जात ।
येईं बा धांवत देवराया ॥३॥


येरे देवा आतां नामा तुज बाहात ।
येईं बा धांवत देवराया ॥४॥

उठा उठा सूर्यनारायणा,Utha Utha SuryaNarayana

उठा उठा सूर्यनारायणा
थांबली सुवासिनी, पूजना

किरणहार हे गुंफित आली
उषासुंदरी धुक्यात न्हाली

नवरंगांची उधळण झाली गगनाच्या अंगणा

विझल्या तारा, वाहे वारा
शोधीत पक्षी चिमणा चारा
घरोघरीच्या अमृतधारा भूषविती गोधना

गावचि अवघे झाले जागे
दिनक्रमाचे जोडा धागे
धरतीवरती उतरू लागे तेजाचा पाहुणा