चंदनाचे दार माझे CHANDANACHE DAR MAZE

दॄष्ट लागावी हे असे
भाग्य आले हे घरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

उजळल्या दाही दिशा 
न्हावुनिया आली निशा
दीप नक्षी कोरताना
तेज आले अंबरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

आगिन फुलाची नक्षी
माझ्या पदरावरती जडवा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो
फटाकडीचा लवंगी चटका
भुईचक्राचा लावा फटका 
नयन बाणांची आतषबाजी
दिलावरी भिड़वा हो
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

भाग्य लेणं लेऊनी मी
वाण हाती घेऊनी
संसार मी मांडताना
हात होई लाजरा
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा

गरम गुलाबी नवी नव्हाळी  
रात जागुनी करा दिवाळी
मदन राजाच्या शीनगराची
नशा मला चढवा हो 
आज इष्काचा इष्काचा इष्काचा
फुलबाजा उडवा हो

निरांजन लोचनी
दोन ज्योती लावुनी
अशी ओवाळींन देव आज आले मंदिरा 
चंदनाचे दार माझे
सोनियाचा उंबरा


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम  RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर , शोभा जोशी  USHA MANGESHAKAR,SHOBHA JOSHI
Movie / Natak / Album -लक्ष्मी  LAKSHMI

14 comments:

 1. याचा व्हिडीओ युट्यूब वर अपलोड कराल का?

  ReplyDelete
 2. HE GANE U TUBE VAR NAHI.KRUPAYA HA PURN CINEMA u TUBE VAR TAKAVA

  ReplyDelete
 3. PLEASE PUT THIS WHOLE PICTURE ON u TUBE

  ReplyDelete
 4. please show whole cinema on u tube

  ReplyDelete
 5. मी खुप सर्च केलं. हे गाणं युट्युबवर नाही. या दिवाळीत एफ एमवर वगैरे कुठेही ऐकु आलं नाही. या गाण्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. कृपया काहीतरी करा.

  ReplyDelete
 6. Replies
  1. ya ganachi survat दृष्ट लागावी असे हे भाग्य आले या घरा ashi ahe

   Delete
 7. हे गाणे अतिशय सुंदर आहे कृपया हे गाणे u tube टाका

  ReplyDelete
 8. आधी हे गाणे युट्युब वर होते, आता दिसत नाही. कुणाकडे असेल तर कृपया अपलोड करा ही विनंती.

  ReplyDelete
 9. हे गाणे मला एम पी 3 फॉरमॅट मध्ये हवे आहे। कृपया अपलोड करा ही विनंती। बऱ्याच साईट वर सर्च केले पण कुठेच नाही।

  ReplyDelete
 10. कृपया हे गाणे यु टूब वर टाकावे
  पुर्ण सिनेमा आहे पण फक्त गाणे नाही विनंती की गाणे पण टाका

  ReplyDelete