लाज लाजुनी मी LAJ LAJUNI MI

हिरवा शालू हिरवी चोळी
हिरवा चुडा मी ल्याले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

जोडिनं बसता लग्नाला 
मांडी लागली मंडीला
चटकन त्यांनी चिमटा काढला
बावरून मी गेले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

होमा भवतिनं फिरताना 
हात हातामधी धरताना
गचकन त्यांनी हात दाबला
भलतेच केले चाळे
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

रंग खेळता हातनं
विडा तोडिता दातानं 
कचकन त्यांनी ओठ चावला
अंग शहारुन आले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले

पहिल्या राती मी रंगात
चंदनाची चोळी अंगात
गपकन त्यांनी मीठी मारिता 
शिनगारात मी न्हाले
लाज लाजून मी गोरीमोरी झाले
न गोरीमोरी झाले


Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -राम कदम RAM KADAM
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -चंदनाची चोळी अंग अंग जाळी CHANDANACHI CHOLI ANG ANG JALI

No comments:

Post a Comment