Showing posts with label पतिव्रता (१९५९). Show all posts
Showing posts with label पतिव्रता (१९५९). Show all posts

संपले जीवन संपली,Sampale Jeevan Sampali

संपले जीवन संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा

उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा

चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
पडो देह माझा तुझे गुण गाता

नको जिणे झाले मिटु दे हे पान
तुझे तूच देवा घेऊनि जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता

रसिका गाऊ कोणते,Rasika Gau Konate

रसिका गाऊ कोणते गीत ?
तीही जाता रुसुनी मजवर, रुसले रे संगीत !

जुळल्या तारा पहिल्या भेटी
राग रंगले जुळता प्रीती
झरे मेघमल्हार लोचनी आठवता ती प्रीत !

तुटल्या तारा, रुसली वीणा
सूर संपले कुठल्या ताना
आज बैसलो निर्माल्याला तुजसाठी फुलवीत !

रस बरसत अमृत,Ras Barasat Amrut

रस बरसत अमृत वीणा
सूरांतुनी संगीत साधना

ये आकारा सुस्वरता
सूर धावती विसरून भान
सूर सात नाचतात गीत उद्याची गात गात

नाचती तरंग हो
उजळती रंग हो
आली शामल संध्या गगनात
धुंद किनारा धुंदित लाट
बोले सूरां, कानी भरा, झुळझुळत्या जलधारा