Showing posts with label S-सुरेश हळदणकर. Show all posts
Showing posts with label S-सुरेश हळदणकर. Show all posts

हांसरा चंद्रमा HASARA CHANDRAMA

हांसरा चंद्रमा ।

उधळित मधुर स्मित चंद्रिका वाटे ॥

नयनि या तारका ।

वेधिती जीव हा सारखा ।

फुलतसे वदनि मनोहर काय मोगरा ॥

Lyrics -प्रल्हाद केशव अत्रे PRALHAD KESHAV ATRE
Singer -सुरेश हळदणकर SURESH HALADAKAR
Movie / Natak / Album -जग काय म्हणेल JAG KAY MHANEL

विमल अधर निकटि,Vimal Adhar Nikati

विमल अधर निकटि मोह हा पापी । वदन-सुमन-गंध लोपी ॥

धवला ज्योत्स्ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर ॥

ललना देवता जगाची, Lalana Devata Jagachi

ललना देवता जगाची ।
भूषवि संसाराला ॥

नभी जशि चंद्रिका हासरी तारका ।
स्त्री तेवि जगताला ॥

मी वाजवीन मुरली,Mi Vajaveen Murali

मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा

कालिंदिचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी न्‌ माझी सांगू नकोस लोकां

लोकांस काय ठावे संबंध हे युगांचे
हे वेगळेच नाते प्रेमातल्या जनांचे
दिसतो जरी न वारा झुलती कदंबशाखा

मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही ही बंधने तरी का ?

गोविंदा रे गोपाळा रे,Govinda Re Gopala Re

गोविंदा रे गोपाळा रे
छंद तुझा जडला, घननीळा

जगजेठी हा बनुनी गुराखी
पाठीवरती घोंगडी टाकी
यमुनातीराला नेतो कपिला असा हा हरी सावळा

व्याकूळ अंतर राहि निरंतर
नयनीचे नीर झरते झरझर

दर्शन दे रे आता मजला तुझ्या दासा नंदलाला