Showing posts with label S-सरस्वती राणे. Show all posts
Showing posts with label S-सरस्वती राणे. Show all posts

ललनामना नच, Lalana Mana Nach

ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ।
सृजनि त्यांच्या विधि तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम ॥

घनश्याम पाहिला मी,Ghanshyam Pahila Mi

घनश्याम पाहिला मी घनश्याम पाहिला

दहिदुध लोणी घरी चोरिले
उखळाला मग तया बांधिले
धडपड करती हात चिमुकले
तो नंदलाल पाहिला

मोरपिसांचा मुगुट शोभतो
अधरी पावा मधुर वाजतो
गोपगोपिकांसवे नाचतो
मुरलीधर मी पाहिला

मेघासम तो श्याम सांवळा
हृदयमंदिरी माझ्या लपला
स्वप्नी दिसला मधुर हासला
मनमोहन मी पाहिला

घनश्याम नयनी आला,Ghanashyam Nayani Aala

घनश्याम नयनी आला
सखे, मी काजळ घालू कशाला ?

रोमांचांनी नटली काया
हिरे-माणके कशास वाया ?
कशास मोहनमाला ?

कटीभोवती कर कृष्णाचे
लेणे ल्याले आभासाचे
कशास मग मेखला ?


कृष्णसख्याची मादक मुरली
रात्रंदिन या कानी भरली
शृंगार सर्व झाला !